नवी दिल्ली : अंतराळात पृथ्वीशिवाय इतर कुठल्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का? हा कायमच कुतूहलाचा विषय असतो. आता आपण या प्रश्नाच्या अगदी जवळ पोहचलो आहोत. येत्या 25 वर्षात पृथ्वीवरच्या लोकांचा एलियनशी(aliens) डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणार असल्याचा दावा केला जात आहे.
मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिक अथक परिश्रम घेत आहेत. विशेषत: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’ (NASA)अनेक मोहिमा राबवत आहे. जीवनसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासा लवकरच मंगळाच्या पृष्ठभूमिवरील खडक व मातीचे नमुने(rock and soil samples) पृथ्वीवर(Earth) आणणार आहे.
जीव सृष्टीचा शोध घेण्यासाठी मंगळावर आतापर्यंत अनेक प्रोब, रोव्हर आणि लँडर पाठवण्यात आले आहेत. मंगळावर अथवा अवकाशात अन्य ठिकाणी जीव सृष्टीचे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
यामुळे शास्त्रज्ञ आपल्या सूर्यमालेबाहेरील आकाश गंगांचा अभ्यास करुन जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. यामुळे पुढील 25 वर्षांत सूर्यमालेबाहेरील आकाश गंगेतील ग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यात यश येईल. यामुळे पृथ्वीवरच्या लोकांचा एलियनशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट होईल असा दावा केला जात आहे.
एलियनशी संपर्क साधता येईल असे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत केले जाणार आहे. शास्त्रज्ञांच्या या दाव्यामुळे खगोलप्रेमी अचंबित झाले आहेत.
स्वित्झर्लंडमधील ‘इटीएच ज्यूरिच’चे अॅस्ट्रोफिजिसिस्ट साशा क्वांज यांनीस याबाबतचा दावा केला आहे. आपल्याशिवाय ब्रह्मांडात आणखी जीव असण्याची दाट शक्यता आहे. अन्य ग्रहांवर हे जीव असू शकतात. अनेक दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात एलियनशी संपर्क झाल्याचा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.
सध्या पाच हजारांहूनही अधिक बाह्यग्रहांचा शोध लावण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. अजून असंख्य बाह्यग्रहांचा शोध लागणे बाकी आहे. याशिवाय आपल्या सूर्यमालेबाहेर 10 हजार कोटींहून अधिक तारे आहेत. प्रत्येक ताऱ्याला अनेक ग्रह असतात. यामुळे लवकरच एलियनशी संपर्क होऊ शकतो.