मुंबई : भारतात असंख्य विद्यार्थी (Student) प्रशासकीय सेवेत नोकरी करण्यासाठी परीक्षा देत असतात. प्रशासकीय अधिकारी (IAS)होण्यासाठी परीक्षा होते, त्यासाठी विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करीत असतात. विशेष म्हणजे त्या परीक्षेसाठी (UPSC exam) लोकं 8 ते 16 तास अभ्यास करीत असतात. ज्यांना परीक्षा पास व्हायची आहे, असे विद्यार्थी इकडं तिकडं फिरायचं सोडून आपल्या अभ्यासावरती लक्ष केंद्रीत करतात. कारण त्याचं लक्ष फक्त अभ्यास करण एवढचं असतं, अनेकांनी ही परीक्षा पास पार केली आहे. त्यासाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरेना झालंय. खरतर, ट्विटरवर ‘यूपीएससी नोट्स'(@UPSC_Notes) नावाच्या अकाऊंटवरुन एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ दोन दिवसापुर्वी शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. कोणीतरी त्या मुलीला विचारलं आहे की, अभ्यास न करता आयएएस कसे होणार? त्यानंतर काय झालं ते तुम्ही व्हिडीओ पाहा.
नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्या मुलीने उत्तर असं दिलं की, लोकांसाठी तो व्हिडीओ मनोरंजनाचं साधन झालं. अनेकांनी तो व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. आतापर्यंत त्या व्हिडीओ हजारोच्या संख्येने व्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत मजेशीर कमेंट सुध्दा आल्या आहेत.
— UPSC NOTES (@UPSC_Notes) March 26, 2023
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी सध्या लोकं काहीही करताना दिसतात. सद्याचा मजेशीर व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्यावर मजेशीर कमेंट सुध्दा केल्या आहेत.