सामन्यादरम्यान इंद्रदेव दयाळू, यूजर्स म्हणाले ‘बाबर नाही, ‘बादल आझम’ ठरला सामनावीर

| Updated on: Sep 03, 2023 | 8:35 AM

Ind vs pak match : काल भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील रोमांचक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यानंतर सोशस मीडियावर मीम्सचा महापूर पाहायला मिळाला आहे. ज्या खेळाडूने काल खराब कामगिरी केली. त्याचे अधिक मीम्स व्हायरल झाले आहेत.

सामन्यादरम्यान इंद्रदेव दयाळू, यूजर्स म्हणाले बाबर नाही, बादल आझम ठरला सामनावीर
mims
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान (Ind vs pak live score) यांच्यात मॅच होणार असते. त्यावेळी चाहते टिव्हीच्या समोरुन उठत नाहीत. त्याचबरोबर मॅचच्या आगोदर जी काही काम असतील ती उरकून घेतलेली असतात. कालची मॅच रोमांचक होणार असं वाटतं होती. कारण टीम इंडियाने सुरुवातीला फलंदाजी करताना मर्यादीत धावसंख्या उभारली होती. त्यामुळे विजय (India vs Pakistan cricket) कोणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु पावसामुळे कालचा (Ind vs pak match) सामना रद्द झाला. त्यानंतर सोशस मीडियावर मीम्स महापूर पाहायला मिळाला. अनेकांनी मीम्सच्या माध्यमातून अनेक खेळाडूंचे धिंडवडे काढले आहेत. काही मीम्स लाखो लोकांनी पाहिले आहेत.

काल आशिया चषकातील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. त्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियामध्ये ईशान किशन 82 आणि हार्दिक पांड्या 87 या दोघांनी काल चांगली फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 266 पर्यंत पोहोचली. ज्यावेळी पाकिस्तानची फलंदाजी सुरु झाली, त्यावेळी पाऊस सुरु झाला. दोन तास झाल्यानंतर सुध्दा परिस्थिती सुरळीत झाली नसल्यामुळे सामना रद्द करावा लागला.

मॅच रद्द झाल्यामुळे दोन्ही टीमला १-१ पॉईंट देण्यात आला आहे. काल रोमांचक सामना पाहायला मिळेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. परंतु पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सगळं चित्र बदलून गेलं, ज्यावेळी मॅच रद्द झाली, त्यावेळी ट्विटर परवरती #INDvPAK टॉप ट्रेंडवरती होती.