मेलबर्न : भारत विरुद्ध पाकिस्नान (Ind Vs Pak T20 Match Video) या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या सामन्यात भारताने (India) रविवारी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाने भारतीने दिवाळीची सुरुवात धुमधडक्यात झालीच. मॅचमधील रोमांच, कोहलीचा ‘विराट’ (Virat Kohli against Pakistan) परफॉरमन्स, हार्दिकची संयमी खेळी, या सगळ्याचं कौतुक झालं. विजय खेचून आणणं काय असतं, यावरुन चर्चा रंगल्या. पण या हायव्होल्टेज मॅचआधीचा एक सुंदर व्हिडीओ समोर आला आहे.
भारताने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मिळवलेला विजय जितका खास आहे, तितका हा व्हिडीओदेखील खास आहे. कारण या व्हिडीओमध्ये देशांच्या सीमांची मर्यादा ओलांडून दोन्ही देशांचे क्रिकेट फॅन्स एकत्र, एकमेकांसोबत, एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून नाचताना, आनंद वाटताना दिसले.
Divided by Babar Azam vs Kohli.
United by Pasoori pic.twitter.com/9DttupV5KI
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 24, 2022
देशांच्या सीमा जरी आड येत असल्या तरी क्रिकेटवरचं प्रेम दोन्ही देशातल्या नागरिकांना एकत्र आणतं. एकमेकांसोबत सेलिब्रेशन करतानाही दिसणारं हे दृश्य आता व्हायरल झालंय. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर स्टेडिअमधील प्रेक्षकांनी पसुरी गाण्यावर ठेका धरला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात अनेकांनी पोस्ट केला आहे.
Divided by the British Raj, United by “Pasoori” (a song worth searching up on YouTube). This is incredible.
(Vid credits: Shusmanshahid on TikTok) pic.twitter.com/hSqVBxi5Q1
— Aryan Bajpai (@Voldymorte2) October 23, 2022
एका युजरने, हा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलंय की, राजकारणाने जरी दोन देश विभक्त झाले असले, तरी कला, संगीत यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांची एकी एमसीजी स्टेडिअममध्ये पाहायला मिळालीय. हा व्हिडीओ त्याचाच दाखला देतोय, असंही काहींनी म्हटलंय.
फक्त भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानातील ट्वीटर युजर्सही हा व्हिडीओ आनंदाने शेअर करताना दिसत आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरसह वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्सवर हा व्हिडीओ गाजतोय.
ICC वर्ल्ड कप टी-20मधील भारताचा पहिला सामना रविवारी पाकिस्तानसोबत झाला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 160 धावांचं आव्हान भारताला दिलं होतं. पण सुरुवातीच्या 6 ओव्हरमध्येच भारताने 4 विकेट्स गमावल्या स्वस्तात गमावल्या होत्या. 31-4 असा स्कोअर झाल्यानंतर भारतीय चाहत्यांनी जिंकण्याची आशा सोडूनच दिली होती.
पण अखेरच्या ओव्हरपर्यंत हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीने किल्ला लढवला. जवळपास हातातून गेलेली मॅच पुन्हा भारताच्या हातात आणून विजय मिळवून दिला. अखेरच्या तीन ओव्हरमध्ये सामना फिरल्यानंतर विराट कोहलीसह प्रत्येक भारतीयाने केलेला जल्लोष भारीच होता. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलेल्या सामन्यात भारताचे रोमहर्षक विजय मिळवत वर्ल्ड कपमध्ये आपला खातं उघडलं.