ऋषिकेश : भारतीय सैन्याने (Indian Army) आपल्या चमकदार कामगिरीने आपले डोळे अनेकदा दिपवले आहे. भारतीय सैन्याच्या धाडसाचे आणि दमदार कामगिरीचे जगभर कौतुक होत असते. जगातील उत्तम सैन्यापैकी एक म्हणून भारतीय सैन्याकडे पाहिले जाते. भारतीय सैन्य सीमेवर तर (Border Security Force) आपले कर्तव्य चोख बजावून आपल्याला सुरक्षित ठेवत आहेच. मात्र भारतीय सैनिक नागरिकांच्या प्रती असलेले दायित्वही तेवढ्याच सचोटीने निभावत आहे. याचा प्रत्येय पुन्हा एकदा आदा आला आहे. भारतीय सैन्याच्या साहसाचा आणि चतूर कौशल्याचा असाच एक व्हिडिओ (Indian Army Video) सध्या समोर आला आहे. नदीत बुडणाऱ्या दोन मुलींना वाचवतानाचा हा थरार पाहून तुम्हीही अवाक राहाल. कारण हा पाहण्यातला थरार आता चांगलाच चर्चेत आहे. या थराराचा व्हिडिओही समोर आला आहे.’
ऋषिकेशमधील फूल छत्ती येथे आज भारतीय लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्याने दोन मुलींची बुडताना वाचवत सुखरूप सुटका केली. या मुली नागरिकांच्या तराफ्यावरून पडल्या आणि थेट नदीत वाहून जाऊ लागल्या यांना वेळीच बाहेर काढलं नसतं तर या बुडाल्या असल्या आणि भलताच अनर्थ घडला असता, अशी माहिती सैन्याकडून देण्यात आली आहे.
Two civilian girls were rescued by one Indian Army Rafting team member today at Phool Chatti in Rishikesh. These girls fell out of a civilian raft and would have drowned if not rescued in time: Indian Army officials pic.twitter.com/tV4Qm8diQi
— ANI (@ANI) April 29, 2022
या मुली पाण्यात पडल्यावर वेगाने वाहून जाताना या व्हिडिओत दिसत आहे. यावेळी तातडीने जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. सुरूवातील या मुलींनी रशी टाकून बाहेर काढण्याच प्रयत्न करतान जवान या व्हिडिओतून दिसून येत आहे. मात्र यावेळी पाण्याचा वेगही जास्त आहे. त्यामुळे या मुलींना पाण्यावर तरंगणेही कठीण होऊन बसले आहे. या व्हिडिओत या मुलींनी सेफ्टी जॅकेट घातलेलेही दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना पाणयावर तरंगण्यास काही वेळ तरी मदत झाली. बराच प्रयत्न करूनही या मुलींना दोर पकडणे शक्य झाले नाही. त्यानंतर जवान लगेच पाण्यात उतरले आणि तात्काळ या मुलींना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे त्या सध्या सुखरूप आहेत.