मुंबई : आपल्या देशात अधिकतर लोकं ट्रेनमधून (Indian Railway) प्रवास करतात. विशेष म्हणजे जनरल डब्ब्यामध्ये अधिक गर्दी पाहायला मिळते. कारण त्यामध्ये अचानक गावी जाणारे अधिकजण असतात. एप्रिल, मे या दोन महिन्यात विद्यार्थ्यांनी सुट्टी असल्यामुळे गावी जाणारे प्रवासी अधिक असतात. इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनूसार, ६ मे ला एक व्हिडीओ ट्रेनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. देवगिरी एक्सप्रेस (Devagiri Express) ट्रेन होती, त्यातला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका व्यक्ती टॉयलेटला जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागली. हा व्हिडीओ अभिजीत डिपके यांनी ट्विटरवरती (twitter viral video) शेअर केला आहे. या व्हिडीओ १० लाख लोकांनी पाहिलं आहे.
अभिजीतचा चुलत भाऊ मागच्या महिन्यात औरंगाबादहून मुंबईला निघाला होता. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हिडीओ रात्री दोन वाजता शूट केला आहे. त्यावेळी ट्रेनमध्ये लोकं चालतात तिथंही प्रवासी बसले आहेत. म्हणून त्या व्यक्तीची मोठी अडचण झाली आहे.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, “हा व्हिडीओ माझ्या चुलत भावाकडून मिळाला आहे, तो रेल्वेने प्रवास करीत होता. तिथं त्याच्या मित्राला टॉयलेटमध्ये जाण्यासाठी रस्ता कसा तयार करावा लागला आहे. @RailMinIndia ट्रेनच्या प्रवाशांना एक धाडसी खेळात बदल करण्यासाठी धन्यवाद”
Got this video from my cousin who was travelling in Railway.
Here is his friend trying to make his way to the toilet. @RailMinIndia, thank you for transforming train journey into an adventure sport. pic.twitter.com/3fuHdXWS2A
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) June 18, 2023
हा व्हिडीओ पाहिल्यापासून त्यावर कमेंटचा पाऊस पडला आहे. एकाने लिहीलं आहे की, मी ट्रेनमधून प्रवास करीत असताना अनेकदा अशा गोष्टींचा सामना केला आहे. प्रवासी वेळोवेळी उपलब्धतेनुसार सहजतेने जुळवून घेतात.” दुसर्या नेटकऱ्याने तक्रार केली, “कधीकधी 3rd AC मध्ये देखील अशीच परिस्थिती उद्भवते.”