IndiGo Airline flight : गुटखा थुंकण्यासाठी त्याने म्हटले ताई जरा विमानाची खिडकी उघडा

| Updated on: Jan 23, 2023 | 7:27 PM

इंन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हीडीओ शेअर झाला आहे. इंडीगो एअरलाईनच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने एका प्रवाशाने जरा खिडकी उघडता का मला थुंकायचे आहे अशी विचारणा केल्याने नेमके काय घडले हे पाहणे मजेशीर ठरले आहे.

IndiGo Airline flight :  गुटखा थुंकण्यासाठी त्याने म्हटले ताई जरा विमानाची खिडकी उघडा
GUTAKHAAIR
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : हवाई प्रवासात अलिकडे घडलेल्या काही वादग्रस्त आणि खळबळजनक घटनानंतर आता चक्क एकमजेशीर घटना ( VIRAL ) व्हायरल होत आहे. इंडीगो एअरलाईनच्या (IndiGo Airline flight )  एका फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने विमान हजारो फूट उंचीवर उडत असताना एअर होस्टेटला गुटखा थुंकण्यासाठी क्क विमानाची खिडकी उघडण्याची विनंती केल्याचा मजेशीर व्हीडीओ वायरल होत आहे. इंन्स्टाग्रामवर गोविंद शर्मा यांनी या युजरने विमानप्रवासा दरम्यान आलेला मजेशीर अनुभव शेअर केला आहे.

इंन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हीडीओ शेअर झाला आहे. इंडीगो एअरलाईनच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने एका प्रवाशाने जरा खिडकी उघडता का मला थुंकायचे आहे अशी विचारणा करताच प्रवाशांसह तेथील एअरहोस्टेटलाही हसू आवरणे कठीण झाल्याचे या व्हीडीओत दिसत आहे. एस्क्यूज मी, खिडकी खोल दिजीए , गुटखा थुकना हैं असे या प्रवाशाने एअरहोस्टेटला विचारतानाचा हा व्हीडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे, यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. एका प्रवाशाने ‘कानपूर फ्लाईट हॅव अपडेट धीस फिचर्स’ अशी मजेशीर टीप्पणी केली आहे., तर अन्य एकाने गुटखा मॅटर्स असे म्हटले आहे.

अलिकडेच इंडीगोफ्लाईट्सचा इमर्जन्सी डोअर उघडल्याचा आरोप भाजपाचे कर्नाटकचे युवा नेते तेजस्वी सूर्या यांच्यावर झाला होता. त्यानंतर त्याबद्दल माफीही मागितली होती. त्यानंतर तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष के.अण्णामलई यांनी आपणही त्या विमानात सूर्यांसोबत होतो. असा काही प्रकार झाला नाही. त्यांच्या आसनाला हँडरेस्ट नसल्याने त्यांनी एका आसनावर प्रेशर दिल्याने ते दार उघडल्याने त्यांच्याकडून चुकून हा प्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला होता.

इंडीगोने एअरने 17 जानेवारीला एक परीपत्रक जारी केले होते. त्यात  10 जानेवारीच्या घटनेत विमान जमिनीवर असताना एका प्रवाशाकडून विमानाचा इमर्जन्सी दरवाजा ओपन झाला होता. त्याने त्यानंतर माफी मागितली. त्यामुळे फ्लाईटला उशीरही झाला. परंतू त्या प्रवाशाचे नाव सूर्या नसल्याचे स्पष्टीकरण केले होते.