प्रेरणादायक! बारावीत नापास झाल्या, अन् वयाच्या 22 वर्षी IAS बनल्या, वाचा अंजू शर्माची कहाणी…

| Updated on: Apr 27, 2022 | 4:44 PM

अंजू शर्मा बारावीत असताना त्या अर्थशास्त्र विषयात नापास झाल्या. तसंच त्या दहावीत असताना विज्ञानच्या पेपरमध्ये त्या प्री-बोर्डमध्येही नापास झाल्या होत्या. पण आता त्या आयएएस अधिकारी म्हणून काम करत आहेत.

प्रेरणादायक! बारावीत नापास झाल्या, अन् वयाच्या 22 वर्षी  IAS बनल्या, वाचा अंजू शर्माची कहाणी...
अंजू शर्मा
Follow us on

मुंबई : आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या अपयशाने (Failure) आपण खचून जातो. पण काही लोकांची जीवनकहानी वाचली की प्रेरणा मिळते. आपणही काही करून दाखवण्याची इच्छा निर्माण होते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हालाही प्रेरणा मिळेल. ही कहाणी आहे IAS अधिकारी अंजू शर्मा (Anju Sharma) यांची त्या बारावीत असताना त्या एका विषयात नापास झाल्या होत्या पण मग पुढे त्यांनी प्रगती केली. अन त्या IAS अधिकारी झाल्या. विशेष म्हणजे त्यांनी वयाच्या केवळ 22 वर्षी हे यश संपादन केलंय.

अंजू शर्मा बारावीत असताना त्या अर्थशास्त्र विषयात नापास झाल्या. तसंच त्या दहावीत असताना विज्ञानच्या पेपरमध्ये त्या प्री-बोर्डमध्येही नापास झाल्या होत्या. पण आता त्या आयएएस अधिकारी म्हणून काम करत आहेत.

या यशाबद्दल अंजू शर्मा म्हणाल्या यांनी आपलं मत मांडलं आहे. त्या म्हणाल्या की, “माझ्या आयुष्यातील या दोन घटनांनी माझे भविष्य घडवलं , असं मला वाटतं. प्री-बोर्ड दरम्यान मला खूप अभ्यास करायचे त्यासाठी वेळप्रसंगी जेवणही करायेच नाही. मग माहित नाही पण मी या परिक्षेला घाबरायला लागले. मला वाटू लागलं की मी नापास होईल, अन् तसंच झालं. त्यावेळी मला वाईट वाटलं पण मग मी खूप जास्त अभ्यास केला. अन् आयएएस व्हायचं ठरवलं. पहिल्याच प्रयत्नात मी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आणि आता आयएएस म्हणून माझी नियुक्ती झाली आहे. याचा मला खूप आनंद आहे. मी इतरांनाही सांगू इच्छिते की तुम्ही येणाऱ्या अपयशाने खचू नका. प्रयत्न करा. तुम्हाला यश जरूर मिळेल.”

अंजू शर्मा यांनी 1991 मध्ये राजकोटमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या सध्या गांधीनगरच्या प्रधान सचिव आहेत. त्यांनी गांधीनगर इथे जिल्हाधिकारी म्हणून आणि भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयात विविध पदांवर काम केलं आहे. त्यांनी NRHM मध्ये तीन दशकांहून अधिक काळ सेवा केली आहे.

तसं युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणं येऱ्यागबाळ्याचं काम नव्हे. त्यासाठी मेहनत लागते तासनतास अभ्यासाची साधना लागते. आपण ठरवलं तर काही करू शकतो हेच अंजू यांनी दाखवून दिलंय.