वधूने मेंहदीने हातावर वराचे नाव लिहीले नाही, पण लिहीले असे काही, की लोक बोलले तलाकची तारीखच लिहायची ना !

| Updated on: Apr 08, 2023 | 7:39 PM

सोशल मिडीयावर व्हायरल व्हिडीओत मेंहदीने वधूने अशी काही डीझाईन काढली आहे की ती पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल...

वधूने मेंहदीने हातावर वराचे नाव लिहीले नाही, पण लिहीले असे काही, की लोक बोलले तलाकची तारीखच लिहायची ना !
mehandi-design
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : कोणाच्याही जीवनात विवाह हा एक गोड आठवणीचा आणि खास दिवस असतो. या शुभ दिवसाची तयारी आपण अनेक जण खूप आधीपासून करीत असतात. चांगले दिसण्यासाठी खास कपडे खरेदी आणि मेकअप करतात. लोक डेकोरेशन पासून ते पाहूण्यांचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी करतात. आता तर लग्नाचा हा सोहळा अनेक दिवस चालतो. मेंहदी असो की हळदी लोक सर्व धडाकेबाजपणे साजरे करतात. विवाह सोहळ्यात डेकोरेशन, ड्रेस कोड आणि थीमचा वापर केला जात असतो. सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात वधूच्या हातावर मेंहदी लावली जात आहे. तिच्या मेंहदीत एक अशी गोष्ट आहे की पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल !

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या रिल्समध्ये मुलीच्या हातावर मेंहदी लागत आहे. परंतू मेंदीच्या डिझाईनमध्ये एक अनोखे वैशिष्ट्ये आहे. या डिझाईनमध्ये काही आठवणीत ठेवण्याचे दिवस नोंदविण्यात आले आहेत. ते दिवसपासून युजर मस्करी करीत मजा घेत आहेत. हातावर सर्वात आधी इंस्टाग्रामवर मॅसेज केल्याची तारीख लिहीली आहे. त्यानंतर प्रपोजल, त्यानंतर पहिल्या भेटेची तारीख लिहीली आहे. सर्वात शेवटी लग्नाची तारीख लिहिली आहे. ज्यामुळे हे स्पष्ट होते की मुलाने मुलीला 19 जानेवारी 2022 ला प्रपोज केले आहे. 25 एप्रिल 2022 दोघे एकमेकांना भेटले आणि 31 जानेवारी 2023 ला त्यांचे लग्न ठरले आहे.

 

सोशल मिडीयावर लोक या व्हिडीओला खूपच पसंद केले जात आहे. काही जण त्यांना शुभेच्छाही देत आहेत, काही जण आता तलाकची तारीखही लिहा असा सल्ला देत आहेत. या व्हिडीओला इंस्टाग्रामवर mehandi_by_anku नावाच्या पेजद्वारे शेअर करण्यात आले आहे. कमेंटमध्ये लोकांनी अखेर लग्नाची एवढीपण घाई का आहे. असा सवाल केला आहे, तर काही जणांना मेंहदीची ही डीझाईन खूपच आर्कषक आणि वेगळी वाटली आहे.