तब्बल 26 वर्ष जुन्या स्पर्मपासून (Sperm) मूल होऊ शकतं का? असा प्रश्न कुणी विचारला, तर त्यांचं उत्तर काय असेल, हे आता स्पष्ट झालं आहे. 26 वर्ष जुन्या स्पर्मच्या मदतीने एका महिलेनं बाळाला जन्म (Baby born) दिला. 26 वर्ष स्पर्म स्टोअर करुन ठेवणाऱ्या या व्यक्तीचं वय आता 47 वर्ष आहे. वयाच्या 47व्या वर्षी बाप झालेल्या या व्यक्तीने 26 वर्ष आधीच स्पर्म हा स्टोअर करुन ठेवला होता. त्याने असं का केलं, याचा किस्साही तितकाच रंजक आहे. वयाच्या 21 व्या वर्षीय या व्यक्तीने एका लॅबमध्ये (Interesting story of 26 year old Sperm) आपला स्पर्म जमा केला होता. 26 वर्षांनंतर आता हा स्पर्म कामी आलाय.
स्पर्म 26 वर्ष लॅबमध्ये स्टोअर करणाऱ्या या व्यक्तीचं नाव पीटर हिक्लस आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, 5 जून 1996 रोजी पीटरने आपला स्पर्म लॅबमध्ये जमा केला होता. डॉक्टरांच्या सांगण्यावरुन त्याने आपला स्पर्म लॅबमध्ये साठवून ठेवला होता.
समोर आलेल्या माहितानुसार, पीटर हिक्लस यांना कॅन्सर झाला होता. वयाच्या 21 व्या वर्षी कॅन्सरची लागण झाल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी पीटरला स्मर्प लॅबमध्ये जमा करण्याचा सल्ला दिलेला.
पीटरला कॅन्सर असल्याकारणाने त्याच्यावर किमो थेरपी करण्यात येणार होती. किमो थेरपी सुरु करण्याआधी त्याने आपला स्पर्म लॅबमध्ये साठवून ठेवला पाहिजे, असं डॉक्टरांनी त्याला सांगितलं. त्यानुसार त्याने वयाच्या 21व्या वर्षी आपला स्मर्प लॅबमध्ये स्टोअर केला.
दरम्यान, 20 ऑक्टोबर रोजी पीटर 26 वर्षआधी स्टोअर केलेल्या स्पर्ममुळे बाप बनलेत. त्यांच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन झालंय. IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या जोडीदारानं बाळाला जन्म दिलाय.
पीटर फुटबॉलपटूही राहिले आहेत. ऑस्ट्रेलियात पीटर काही वर्षांपूर्वी फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्या मागच्या बाजूला एक ट्यूमर असल्याचं निदान झालं. Hodgkin’s lymphoma मुळे झालेल्या ट्युमरमुळे त्यांना कॅन्सर झाला. त्यानंतर त्यांच्यावर 9 राऊंड किमो थेरपी करण्यात आली.
किमो थेरपीनंतर पुरुषांचा स्पर्म काऊंट शून्य होतो, असं जाणकार सांगतात. त्यामुळेच उपचाराआधी त्यांना स्मर्प साठवून ठेवण्यासाठीचा सल्ला देण्यात आला होता. पण खरी आश्चर्याची गोष्ट तर पुढे घडली.
पीटर यांनी सांगितलं की, स्टोअर केलेल्या स्पर्मचं आयुष्य हे 10 वर्षच असतं. किमोनंतर माझा स्पर्म काऊंट शून्य झाला होता. पीटर आणि त्याची जोडीदार औरेजिला एकत्र राहू लागला. सर्वसामान्य जोडप्याप्रमाणे त्यांनाही आपल्याला मूल व्हावं, अशी इच्छा होती.
अखेर पीटरने 26 वर्ष जुन्या स्मर्पची माहिती शोधली. IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी तब्बल 28 लाख रुपये खर्च करुन उपचार घेतले. पण अखेर या उपचारांना यश आलं आणि पीटर-औरेजिला यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालंय.