ITBP Commandant Ratan Singh Sonal video : देशसेवेत अर्पण भारतीय लष्करातील जवानांचे धाडस पाहून प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून येते. कारण सीमेवर कितीही कठीण परिस्थिती असली, तरी देशवासीयांच्या शांततेसाठी हे जवान सीमेवर सदैव तत्पर असतात. सध्या एका ITBP जवानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 55 वर्षीय कमांडंट रतन लाल सिंग सोनल यांनी लडाखमध्ये (Ladakh) 17,500 उंचीवर उणे 30 अंश तापमानात (Temperature) 65 पुशअप्स (Pushups) करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतही भारतमातेच्या या शूर सुपुत्रांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखता येत नाही, याचाही हा व्हिडिओ पुरावा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, ITBP कमांडंट रतन लाल सिंह लडाखमधील बर्फाळ शिखरावर पुशअप्स करताना दिसत आहेत. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 17 हजार 500 फूट उंचीवर आहे. त्याच वेळी, येथे तापमान उणे 30 अंश आहे.
कमांडंटचे अशा परिस्थितीतले धाडस आणि उत्साह पाहून भारतीयांची छाती अभिमानाने फुलली आहे. प्रत्येकजण त्यांना सलाम करत आहे. इंडो-तिबेट बॉर्डर कर्मचाऱ्यांचे फोटो समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, सैनिकांच्या प्रशिक्षणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ITBP जवान बर्फाळ भागात आणि उणे 25 अंश तापमानात उभे राहून सराव करताना दिसत होते. हवामानामुळे न घाबरता, ITBP जवान गोळीबार करताना आणि सहनशक्तीचा सराव करताना दिसला.
ITBP हे देशातील 5 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. भारत-चीन युद्धादरम्यान ऑक्टोबर 1962मध्ये ITBPची स्थापना झाली. ITBP लडाखमधील काराकोरम खिंडीपासून अरुणाचल प्रदेशातील जचेप लापर्यंत चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमेच्या 3,488 किमी लांबीचे रक्षण करते.
#WATCH | 55-year-old ITBP Commandant Ratan Singh Sonal completes 65 push-ups at one go at 17,500 feet at -30 degrees Celsius temperature in Ladakh.
(Source: ITBP) pic.twitter.com/4ewrI8eSjL
— ANI (@ANI) February 23, 2022