सोशल मिडियामध्ये आजकाल बंगळुरु जाम चर्चेत आहे. बंगलुरुमध्ये मध्यंतरी पाणी टंचाईने लोक हैराण झाले होते. आता पाऊस सुरु आहे.यात एक कॉमन गोष्ट म्हणजे टॅफीक संदर्भातील एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. हे शहर मुंबई प्रमाणे ट्रॅफीक जामसाठी प्रसिद्ध आहे. आयटी राजधानी असलेले बंगळुरु शहर जगातील सर्वात वर्दळीच्या शहरात या शहराचा समावेश झाला आहे. वेगाने विकसित होणाऱ्या बंगळुरु शहरातील नियोजन आणि प्लानिंगचा अभाव असल्याने या शहरात आता आता ट्रॅफिक जाम संबंधीचा एक पीक बंगलुरु मोमेंट व्हायरल होत आहे. गुगल मॅपमध्ये दाखविलेल्या वेळेमुळे ही पोस्ट व्हायरल होत आहे.
ट्वीटर हॅंडलवर आयुष सिंह याने ही पोस्ट केली होती. ट्वीटल हँडलवर एक पिक पोस्ट केली आहे. या पिकमध्ये गुगल मॅपचा एक स्क्रीन शॉट घेतलेला आहे. ज्यात ब्रिगेड मेट्रो पोलिसपासून ते केआर पुरम रेल्वे स्टेशनवर जाण्याचे वेळ आणि अंतर विचारण्यात आले होते. मजेदार म्हणजे गुगलने जो काही वेळ सांगितला तो पायी जाणाऱ्यांसाठी कमी दाखविला आहे. आणि कारने जाणाऱ्यांसाठी जास्त दाखविला आहे.कार किंवा कॅबने हे अंतर पार करण्यासाठी 44 मिनिटांचा काळ दाखविला आहे. तर पायी चालत जाण्यासाठी याच अंतरासाठी गुगल मॅपने चक्क 42 मिनिटांचा कालावधी दाखविला आहे. आयुष याने या पोस्टवर लिहीलेय की असे केवळ बंगळुरुतच होऊ शकते. बंगळुरुतील या परिस्थितीशी परिचित असणाऱ्यांनी या पोस्टवर भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.
येथे पाहा एक्स पोस्ट –
This happens only in Bangalore pic.twitter.com/MQlCP7DsU7
— Ayush Singh (@imabhinashS) July 25, 2024
या पोस्टवर आतापर्यंत सहा लाखाहून अधिक युजर मिळाले आहेत. 14 हजार लोकांहून अधिक युजर्सनी या पोस्टला लाईक्स केले आहे. काही युजरने आपले स्वत:चे वाहन वापरण्याऐवजी आता पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला पाहीजे. एका अन्य युजरने लिहीलेय की बंगळुरु येथील ट्रॅफीक कॅपिटल बनलेला आहे. त्यामुळे आता ट्रॅफीक जामची सवय करुन घ्या अशी टिप्पणी त्याने केली आहे.