सध्या टेक्नॉलॉजीचं जग खूप विस्तारलं असून रोज नवनवे प्रयोग होत असतात, शोध लागत असतात. त्यामुळे जगणं खूप सोप्पही झालं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी लोकं टेक्नॉलॉजीवर अवलंबून असतात. त्याचे काही चांगले फायदेही आहेत, मात्र काही वेळा अशा अजबगजब गोष्टी ऐकायला येतात, ज्यामुळे आश्चर्याचा धक्काच बसतो. अशीच एक अनोखी घटना उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये घडली आहे. तेथे एका भाजप नेत्याच्या घरी आता पाकिस्तानी सूनबाई येणार आहेत. भाजप नेत्याच्या मुलाने पाकिस्तानी तरूणीशी ‘ऑनलाइन’ निकाह पार पडला. या लग्नाचीच सध्या सर्वत्र चर्चा सूरु आहे. टेक्नॉलॉजीच्या जमान्यात काहीही होऊ शकतं, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब या निमित्ताने झालं. व्हिसा मिळत नसल्याने आणि वधूच्या आईची तब्येत बिघडल्याने वधू-वराचा ऑनलाइन निकाह झाला.
व्हिसा मिळाल्याने लढवली अनोखी शक्कल
न्यू एजन्सीजनुसार, जौनपूरमधील भाजप नेते तहसीन शाहिद यांचा मुलाचं अब्बास हैदर याचं पाकिस्तानातल्या तरूणीशी लग्नं ठरलं होतं. मुलीचं नाव अंदलीप ज़हरा असून ती लाहोरची रहिवासी आहे. त्यांनी व्हिसासाठी अर्जही केला होता,मात्र दोन्ही देशांमधील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर नवऱ्या मुलाला व्हिसा मिळू शकला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
वधूच्या आईची तब्येत बिघडली
त्याच दरम्यान वधूच्या आईची प्रकृती बरीच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांची तब्येत आणखीनच खालावली. अशा परिस्थितीत शाहिद यांनी ऑनलाइन पद्धतीने दोघांचा निकाह करण्याचा निर्णय घेतला.
जौनपूरमध्ये वरात आणि लाहोरमध्ये वधू
त्या निर्णयानुसार, शु्क्रवारी रात्री शाहिद हे शेकडो लोकांच्या वरातीसह इमामबारा येथे पोहोचले आणि ते ऑनलाइन ‘निकाह’मध्ये सहभागी झाले. तर वधू आणि तिच्या कुटुंबियांनी लाहोरमधून या लग्नाला हजेरी लावली. टीव्ही स्क्रीनसमोर हाँ ऑनलाइन निकाह झाला. दोन्ही बाजूंच्या काझींनी हे लग्न लावून दिलं. या निकाहाबाबत शिया धर्मगुरू मौलाना महफुझुल हसन खान म्हणाले की, इस्लाममध्ये निकाहसाठी महिलेची संमती आवश्यक असते. ती समंती मिळाली तर दोन्ही पक्षांतील मौलाना एकाच वेळी त्या-त्या ठिकाणी विवाह लावून देऊ शकतात.
जौनपुर में BJP नेता तहसीन शाहिद के बेटे अब्बास हैदर ने पाकिस्तानी लड़की सैय्यदा अंदलीब जहरा से वीडियो कॉल पर निकाह किया।#BharatBandhAgainstEvm #SarfarazKhan pic.twitter.com/7XpnnhUFuR
— Madhubani Muslim Mahasabha (@madhubanimuslim) October 19, 2024
वर पाहतोय वधूची वाट
दरम्यान , या निकाह सोहळ्याला भाजपाचे आमदार ब्रिजेश सिंग प्रिशू उपस्थित होते. तसेच अनेक नागरिकांनी हजर राहून दोघांना आशीर्वाद दिले. आपल्या पत्नीला आता कोणताही त्रास न होता भारतीय व्हिसा मिळेल, अशी आशा हैदरने व्यक्त केली.