Russia Ukraine conflict : रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या वादाचं रुपांतर आता युद्धात झालंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी स्फोट होताना दिसून येत आहेत. अमेरिकेनं इशारा दिल्यानंतरही रशियानं त्यास न जुमानता युक्रेनवर हल्ला केला. या दोन देशातल्या संबंधाचा, युद्धाचा परिणाम जगभरात पाहायला मिळत आहे. ट्विटरवर रशिया, युक्रेनसंबंधीचे हॅशटॅग्स (Hashtags) ट्रेंड (Trend) होत आहेत. तर सोशल मीडियावर मीम्स आणि विनोदांचा (Jokes) पूर आलेला पाहायला मिळत आहे. आपल्याकडे जसे रजनीकांत स्टाइलचे विनोद आहेत, तसे रशियात पुतीन यांचे विनोद आहेत. आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे विनोद व्हायरल होत आहेत. त्यातले काही विनोद तर खूपच मजेशीर आहेत.
– पुतिनला शाळेला उशीर झाला तेव्हा शिक्षकाने संपूर्ण वर्गाला शिक्षा दिली, का तर ते लवकर आले.
– पुतिन शाळेत गेले नाहीत म्हणून शाळेनं सुट्टी जाहीर केली.
– पुतिन यांचा जन्म झाला तेव्हा त्यांनी आपल्या आई-वडिलांचं नाव ठेवलं.
– पुतिन यांनी ते हॉस्पिटल बांधले ज्यामध्ये त्यांचा जन्म झाला.
– जेव्हा पुतिन आरशात पाहतात तेव्हा तिथं कोणतंही प्रतिबिंब दिसत नाही कारण तिथं फक्त एकच पुतिन आहे.
– हा माणूस कधीच टॉयलेट फ्लश करत नाही, तो फक्त त्यातून कचरा बाहेर काढतो.
– पुतिन यांचा जन्म झाला तेव्हा ते रडत नाहीत म्हणून डॉक्टरांना चापट मारली.
– पुतिन यांना रशियन जेम्स बाँड म्हणणे बंद करा. जेम्स बाँड हे ब्रिटीश व्लादिमीर पुतिन आहेत.
– पुतिन जेव्हा खाते तयार करतात तेव्हा अटी व शर्ती त्यांच्याशी सहमत होतात.
– पुतिन यांचा फोन थिएटरमध्ये जातो, तेव्हा सिनेमाला ब्रेक लावला जातो.
– पुतिन यांना रशियानं निवडलं नाही, त्यांनी रशियाची निवड केली.
– पुतिन यांचे परदेशी विमानतळावर आगमन :
कस्टम अधिकारी: “व्यवसाय?”
पुतिन: “नाही, फक्त भेट.”
कोविडकाळात विनोद व्हायरल होत होते. तसेच विनोद पुतिन यांच्यावरही झाल्याचे पाहायला मिळत आहेत. एक विनोद असा आहे, की पुतिन यांना खोकला आल्यास म्हणजेच ते खोकल्यास कोविडच मास्क घालतो. हे आणि असे मजेदार विनोद सध्या व्हायरल होत आहेत.