मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी कोणी हेलिकॉप्टर (Helicopter) तयार करतंय, तर कोणी जुगाड करुन घरी बाईक तयार करतंय, सध्या सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तयार करणाऱ्याचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. बोअरवेलचा हातपंप स्वत:चालत असल्यामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जुन्या सायकलचा (cycle) पार्ट वापरून जुगाड केला आहे. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला आहे की, व्हिडीओ प्रचंड व्हायरल केला आहे.
हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरील रीलच्या माध्यमातून पाहू शकता. एका व्यक्तीने त्याला देशी हॅडपंप असं नाव दिलं आहे. त्याच्यासाठी त्या व्यक्तीने हातपंप आणि सायकलची चैन, इलेक्ट्रीक स्विच या गोष्टींचा वापर केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, इलेक्ट्रिक स्विचला वायर जोडून मोटर बसवण्यात आली आहे, जी सायकलच्या चैन-पेडलला आणि पाईपच्या साहाय्याने हातपंपाला जोडण्यात आली आहे. स्वीच दाबताच हातपंप आपोआप चालू होऊन पाणी बाहेर पडू लागते.
हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती यूजर उपेंद्र वर्मा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाख 46 हजार लोकांनी लाईक केला आहे. युजर्सने त्या व्यक्तीची चांगली तारिफ केली आहे. एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहीलं आहे की, जुगाडचा हा व्हिडीओ देशातून बाहेर जाऊ देऊ नका. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की, याच्यापेक्षा चांगली एक मोटर घेतली असती तर…, तुमचा या जुगाड विषयी काय मत आहे हे आम्हाला कमेंट करुन कळवा.