मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर त्याचा कोणी अंदाज सुध्दा लावू शकतं नाही. कधी कोणी घरातील जुन्या कारला हेलिकॉप्टर बनवतं आहे. तर कधी कोणी घरात जुगाड करून कुलर तयार करीत आहे. सध्या एका कारचा जुगाड (jugaad video) केलेला व्हिडीओ (viral video)सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा जुगाड पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर शेअर सुध्दा केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक मारुती 800 स्पीडमध्ये धावत आहे. तु्म्ही हा व्हिडीओ थोडासा लक्ष देऊन पाहा, त्या गाडीचे टायर किती मोठे आहेत. त्या गाडीचे टायर पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. यापूर्वी अशा पद्धतीचा जुगाड तुम्ही पाहिला आहे का ? त्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे.
सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरती automobile.memes नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे- अल्टोच्या क्षमतेला कोणीही हरवू शकत नाही. हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाख लोकांनी पाहिला आहे. लोक त्या व्हिडीओची मजा घेत आहेत. काही लोकांसाठी तो व्हिडीओ मनोरंजन ठरला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओ खूप साऱ्या कमेंट आल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, भाई ही अल्टो गाडी नाही, तर मारुती ८०० आहे. दुसऱ्याने लिहीलं आहे की, असं वाटतंय की, मारुतीच्या गाडीला ट्रकचे टायर लावले आहेत. तुम्हाला सध्याच्या जुगाड विषयी काय वाटतं आहे ? ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा.