Actor Neel Bhattacharya post : श्रीलंकन हिट गाणे मनिके मागे हितेप्रमाणेच बंगाली गाणे कच्चा बदाम हे गाणेदेखील गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर धुमाकळ घातल आहे. या गाण्याचे बोल लोकांच्या डोक्यावर इतके उंच भरारी घेत आहेत की प्रत्येकजण त्यावर इन्स्टाग्राम रील बनवत आहे. कच्चा बदाम हे गाणे कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तिमत्वाने गायले नसून पश्चिम बंगालच्या रस्त्यावर एका गाडीवर वस्तू विक्रेता भुबन बद्याकर याने गायले होते. मात्र, आता तो स्टार झाला आहे. अलीकडेच बंगाली टीव्ही अभिनेता नील भट्टाचार्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ (Video) शेअर केला आहे, ज्यामध्ये भुबन बद्याकर (Bhuban Badyakar) त्याच्या स्वत:च्या कच्चा बदाम (Kacha badam) गाण्यावर डान्स करत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भुबन काही लोकांसोबत त्याच्याच कच्चा बदम या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ आतापर्यंत 9 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. सोशल मीडियाच्या लोकांनाही हा व्हिडीओ चांगलाच आवडत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना बंगाली टीव्ही अभिनेता नील भट्टाचार्यने कॅप्शनमध्ये लिहिले, कीज्या व्यक्तीने कच्चा बदाम गाणे गायले आहे. त्यांना भेटून खूप आनंद झाला. यासोबतच अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना भुबन बद्याकरला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले आहे.
18 फेब्रुवारी रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 32 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरने लिहिले आहे, ‘ओह हो…बादाम अंकल के साथ.’ त्याचप्रमाणे अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांनी भुबनचे कौतुक केले. त्याच्या व्हिडिओचे खूप कौतुक झाले आहे. ‘कच्चा बदाम’ या गाण्याने रातोरात लोकप्रिय झालेल्या भुबन बद्याकरची शैली पूर्णपणे बदलली आहे. ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. याआधी भुबन त्याच्या गाण्याच्या हरयाणवी रिमिक्समध्ये दिसला होता. ज्याला भुबनसह रॅपर आणि गायक अमित धुल यांनी बनवले आहे.