Kangaroo in india : कांगारू… ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी. नाही ना? सस्तन प्राणी हा प्राणी आहे. हा ऑस्ट्रेलियाचा (Australia) राष्ट्रीय प्राणी (National animal) देखील आहे. कांगारू हे शाकाहारी (Vegetarian), मार्सुपियल प्राणी आहेत जे सस्तन प्राण्यांमध्ये त्यांच्या प्रकारात अद्वितीय आहेत. त्यांचे मागचे पाय लांब आणि पुढचे लहान आहेत, त्यामुळे ते उडी मारून हालचाल करतात. शेपटी लांब आणि जाड आहे, जी टोकाच्या दिशेने पातळ होते. असा कांगारू फक्त ऑस्ट्रेलियातच आढळतो. त्याला कधी भारतात पाहिलंय का? अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कांगारुचा हा व्हिडिओ आहे. त्याला नीट चालताही येत नाही. हा व्हिडिओ भारतातील आहे. आता तुम्ही विचार कराल, ऑस्ट्रेलियातच आढळणारा प्राणी भारतात कसा? तर हा तस्करीचा प्रकार असून तो उघडकीस आला आहे.
पश्चिम बंगालमधील जलपायगुडी या ठिकाणी हा कांगारू दिसला. कुणीतरी व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ शेअर केला आणि नंतर तो व्हायरल झाला. याची सत्यता काय, असा सवाल व्हाट्सअॅपवरून विचारण्यात आला आहे. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत हे कांगारू आपल्याला दिसत आहे. याचे कारण त्याच्यासाठी ही जागा पूर्णपणे अनोळखी आहे. त्याचा परिवार त्याच्या जवळ नाही. ते सैरभैर झाले आहे. एका मोठ्या रस्त्यावर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा आणि आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
#बंगाल के जलपाईगुड़ी में दिखे #Kangaroo…
अविश्वसनीय लेकिन सत्य!Someone shared the video on WhatsApp.
News Credit. – #PTINews.@ParveenKaswan @surenmehra @SudhaRamenIFS @susantananda3 @dharamveerifs pic.twitter.com/0giJiKsXjW
— Dipanshu Kabra (@ipskabra) April 2, 2022
या व्हिडिओची माहिती देताना त्यांनी म्हटले आहे, की आपल्याकडील कोणत्याही प्राणीसंग्रहालयात कांगारू नाहीत. जर भारतात ते कुठे दिसले, तर तो एक तस्करीचा भाग असेल. दरम्यान, गेल्या महिन्यात अलीपूरद्वार येथे अशीच एक घटना घडली होती. यात दोघांना अटक करण्यात आली. तर त्यांच्याकडून एक कांगारू जप्त करण्यात आले.
They are not present in any zoo in this area. They are part of smuggling. Later seized. In zoo now for safe custody. Last month also two were arrested with a kangaroo. https://t.co/vUKY5VFx4x
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) April 2, 2022