मुंबई : भारतीय छायाचित्रकार देबदत्त चक्रवर्ती यांना पिंक लेडी फूड फोटोग्राफर ऑफ द इयर 2022 (Pink Lady Food Photographer of the Year 2022) हा पुरस्कार मिळाला आहे. काश्मीरमधल्या कबाब विक्रेत्याचा फोटो त्यांनी काढला होता. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. श्रीनगरमधील खय्याम चौकात हा कबाब विक्रेता त्याचं नेहमीचं काम करत होता. अश्यावेळी या फोटोग्राफरने त्याची ही छबी टिपली त्याला आता आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. काश्मीरच्या रस्त्यावर निवांत संध्याकाळी एक कबाब विक्रेता त्याचं कबाब बनवण्याचं काम करत आहे. तो चिकनला तेल लावत असल्याने तिथं धुर झाल्याचं पाहायला मिळत आहे. आग, त्यावर चिकन कबाब बनवणारा हा कबाब विक्रेता… असा हा फोटो (Viral Photo) टिपण्यात आला आहे.
श्रीनगरमधील खय्याम चौकात हा कबाब विक्रेता त्याचं नेहमीचं काम करत होता. अश्यावेळी या फोटोग्राफरने त्याची ही छबी टिपली त्याला आता आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.
Overall Winner
And finally, huge congratulations to Debdatta Chakraborty, Overall Winner of the 2022 @FoodPhotoAward Competition with Kebabiyana.An amazing winning image! #FoodPhotoAwards22 pic.twitter.com/eQ0eQTsRqQ
— Pink Lady® Food Photographer of the Year (@FoodPhotoAward) April 26, 2022
काश्मीरच्या रस्त्यावर निवांत संध्याकाळी एक कबाब विक्रेता त्याचं कबाब बनवण्याचं काम करत आहे. तो चिकनला तेल लावत असल्याने तिथं धुर झाल्याचं पाहायला मिळत आहे. आग, त्यावर चिकन कबाब बनवणारा हा कबाब विक्रेता… असा हा फोटो टिपण्यात आला आहे. या फोटोला पिंक लेडी फूड फोटोग्राफर ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार मिळाला आहे.
पिंक लेडी फूड फोटोग्राफर ऑफ द इयरचे संस्थापक आणि संचालक कॅरोलिन केनयन यांनी या फोटोबद्दल आपलं मत मांडलं. “विजेत्या फोटोमध्ये धूर, सोनेरी प्रकाश आणि कबाब बनवणाऱ्याची छबी उत्तम प्रकारे टिपली आहे. या फोटोत ती व्यक्ती जेवण बनवत असल्याचं दिसून येतंय. या फोटोतील भाव मनाला स्पर्श करून जातात”, असं त्यांनी म्हटलंय.