Diamond Ring: तब्बल 24 हजार हिऱ्यांची अंगठी; मायक्रोस्कोपने हिरे मोजून गिनीज बुकात नोंद केली; व्हिडिओपाहून थक्क व्हाल

| Updated on: Jul 16, 2022 | 8:14 PM

मश्रूमच्या थीमवरची ही अंगठी डिझाईन केली आहे. केरळमधील सराफाने 24 हजार पेक्षा जास्त हिरे जडवून ही अंगठी तयार केली आहे. यासाठी त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक मध्ये करण्यात आली आहे. केरळच्या एसडब्ल्यूए डायमंड्सचे अब्दुल गफूर अनादियान यांनी एका अंगठीत सर्वाधिक हिरे सेट करून स्पार्कलिंग रेकॉर्ड तोडला आहे. त्यांचा हा अनोखा विक्रम गिनीज बुकने व्हिडिओ शेअर करत जाहीर केला आहे.

Diamond Ring: तब्बल 24 हजार हिऱ्यांची अंगठी; मायक्रोस्कोपने हिरे मोजून गिनीज बुकात नोंद केली; व्हिडिओपाहून थक्क व्हाल
Follow us on

तिरुवनंतपुरम : गिनीज बुकने (Guinness World Records) एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क होत आहेत. हिऱ्याच्या अंगठीचा हा व्हिडिओ आहे. तब्बल 24 हजार हिऱ्यांनी ही अंगठी तयार करण्यात आली आहे. केरळच्या(Kerala) सराफाने ही अंगठी तयार केली आहे. त्याच्या या अनोख्या विक्रमाची गिनीज बुकने दखल घतेली आहे. त्याची या जागतीक विक्रमात नोंद झाली आहे. या पूर्वीचे रेकॉर्ड भारताच्याच मेरठ येथील सराफ हर्षित बन्सल यांच्या नावावर होते. त्यांनी 12638 हिरे जडवून अंगठी बनविली होती.

मश्रूमच्या थीमवरची ही अंगठी डिझाईन केली आहे. केरळमधील सराफाने 24 हजार पेक्षा जास्त हिरे जडवून ही अंगठी तयार केली आहे. यासाठी त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक मध्ये करण्यात आली आहे. केरळच्या एसडब्ल्यूए डायमंड्सचे अब्दुल गफूर अनादियान यांनी एका अंगठीत सर्वाधिक हिरे सेट करून स्पार्कलिंग रेकॉर्ड तोडला आहे. त्यांचा हा अनोखा विक्रम गिनीज बुकने व्हिडिओ शेअर करत जाहीर केला आहे.

गफूर यांनी 24679 नैसर्गिक हिरे जडवून मश्रूमच्या आकाराची ही अंगठी तयार केली. ही अंगठी तयार करण्यासाठी त्यांना तीन महिन्यांचा कालावधी लागला. या अंगठीला त्यांनी ‘अमी’ असे नाव दिले आहे. हा एक या संस्कृत शब्द आहे. या अर्थ अमरत्व असा आहे.

अळंबी हे अमरत्व, दीर्घायुष्याचे प्रतीनिधित्व करते यामुळेच या थीमवर या अंगठीचे डिझाईन तयार करण्यात आल्याचे गफूर यांनी या विषयी बोलताना सांगीतले.

गिनीज बुकने या अंगठीचा एक व्हीडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सर्व बाजूनी अंगठी हिऱ्यांनी चमकताना दिसत आहे. ज्वेलर्सच्या कामाची क्वालिटी आणि बारकाई या व्हिडिओतून दिसत आहे.

गिनीज बुकने या अंगठीची नोंद करून घेताना हिऱ्यांची गुणवत्ता, चमक, त्याचे पैलू या सर्व बाबी विचारात घेतल्या आहेत. मायक्रोस्कोपचा वापरु हिरे मोजण्यात आले.

अशी तयार केली अंगठी?

थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून या अंगठीचे डिझाईन तयार करण्यात आले. यानंतर, द्रव स्वरुपातले सोने मोल्डमध्ये ओतले गेले, थंड केले गेले आणि एकूण 41 अद्वितीय मशरूम पाकळ्यांच्या आकारात अंगठीचा साचा तयार करण्यात आला. बेस पूर्ण झाल्यावर, मशरूमच्या पाकळ्यांच्या प्रत्येक बाजूला प्रत्येक हिरा काळजीपूर्वक आणि हाताने लावला गेला.