मुंबई : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला आहे. एक पोलिस अधिकारी मद्यप्राशन करुन डान्स करीत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ केरळ राज्यातील असल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे. इडुक्की परिसरात पोलिस अधिकाऱ्याने (police officer) दारुचे सेवन केल्यानंतर डान्स केला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यावरती खात्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस या घटनेची कसून चौकशी सुरु आहे. आरोपी ईशानपारा पोलिस स्टेशनमधील सहाय्यक उपनिरीक्षक आहे. मंगळवारी रात्री एका ठिकाणी कार्यक्रम होता. त्यामुळे मंदिर परिसरात पोलिसांचं संरक्षण देण्यात आलं होतं. त्यावेळी अधिकारी तिथं बंदोबस्तासाठी होता.
अधिकाऱ्यावरती आरोप करण्यात आला आहे की, बंदोबस्त लावण्यात आला असताना अधिकाऱ्याने दारू पिऊन डान्स केला. सोशल मीडियावर त्या अधिकाऱ्याचा डान्स केलेला व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ज्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यावेळी अनेक अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पोलिस खात्याने त्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.
And the department gifted a suspension to the Santhanpara Sub Inspector soon after this video from Idukki Pooppara got viral pic.twitter.com/kwblipMkxI
— chandrakanthviswanat (@chandra_newsKer) April 6, 2023
त्याच्यावर आरोप करण्यात आला एसीपीने डान्स केला आहे. त्याचबरोबर ज्यावेळी अधिकाऱ्याने डान्स केला, त्यावेळी तो नशेत होता. केरळ राज्यात सोशल मीडियावर डान्सचा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे. या आगोदर सुध्दा अशा पद्धतीचे पोलिसांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्यावर्षी मध्यप्रदेश राज्यातील पोलिस अधिकाऱ्याचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलं होतं.