नवी दिल्ली: सोशल मीडियावर या ना त्या कारणाने अनेक गोष्टी चर्चेत असतात. काही प्रकरणांमध्ये एखादी व्यक्ती अचानकपणे चर्चेत येते यामागे काही ना काही कारण असते. सध्या सोशल मीडियावर ‘खान सर’ (Khan Sir) चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद पेटलेला आहे. नेटकरी त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी बोलत आहेत. हे ‘खान सर’ नेमके कोण आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहेत. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आहेत. (Khan Sir why trolled by social media users who is Khan sir or Amit Singh)
बिहारची राजधानी पाटणा शहरामध्ये खान सर यांची ‘खान जी एस रिसर्च सेंटर’ ही संस्था आहे. खान सर त्यांच्या अनोख्या शैलीत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात. यामुळे ते सातत्याने चर्चेत असतात. अनेक लोकांना त्यांचा नाव जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यांच्या नावाबद्दल सोशल मीडियावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही लोकांनी खान सर यांचं नाव अमित सिंह असल्याचं देखील दावा आहे.
खान सर यांनी एका व्हिडिओमध्ये लोक त्यांना खान सर या नावानेच ओळखतात असं देखील सांगितले आहे. ते इतिहास, भूगोल, हिंदी, केमिस्ट्री, फिजिक्स या विषयातील एखाद्या मुद्द्यावर, प्रश्नावर लगेचच त्यांच्या शैलीमध्ये उत्तर देतात. सोशल मीडियावर खान सर यांच्या यूट्यूब चॅनेलला 92 लाख लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे. खान सर गेल्या काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावरील वातावरण तापलेलं आहे.
टिपू सुलतान पार्टीने खान सर यांचा फोटो शेअर करत ते मुस्लिम आहेत का नाहीत हे आम्हाला माहीत नाही, असं म्हटलं आहे. या ट्विटवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सलीम शेख नाव असणाऱ्या व्यक्तीने खान सर मुस्लीम असू शकत नाहीत असा दावा केला. तर, काही लोकांनी त्यांना संघी देखील म्हटलं आहे.
24 एप्रिल रोजी खान सर यांनी सोशल मीडियावर फ्रान्स आणि पाकिस्तान यांच्या संबंधात विषयी एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी पाकिस्तानमधील आंदोलन करणाऱ्या मुलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतंय त्यांनी यामध्ये एक कॉमेंट केली होती ती म्हणजे मुलांनो शिक्षण घ्या नाहीतर पंक्चर काढायला लागेल. नाहीतर चौकांमध्ये मटन कापावे लागेल, याशिवाय पुढे खान सर यांनी 18 ते 19 मुलं जन्माला आली तर काय कामाची असं देखील म्हटलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यानंतर खान सर यांच्यावर टीका सुरू झाली. लोक त्यांना ट्रोल करू लागले नेटकरऱ्यांनी खान सर यांच्या व्हिडिओमधील वक्तव्यांना एका विशिष्ट धर्माविरोधी वक्तव्य असल्याचं म्हटलं. दरम्यान खान सर यांच्या नावावर अद्याप गुढ कायम आहे. काही लोक त्यांचं नाव फैजल खान म्हणत आहेत. खान सर यांच्याकडून अद्यापही त्याबद्दल स्पष्टीकरण आलेलं नाही.
संबंधित बातम्या:
Video | तहानलेला गरुड तृप्त, वाटसरुने रस्त्यावरच पाजले पाणी, व्हिडीओ व्हायरल
Video : भेदक नजर, विजेसारखा वेग, मांजरीने केलेली ‘ही’ शिकार एकदा पाहाच
(Khan Sir why trolled by social media users who is Khan sir or Amit Singh )