Kid video : मुले शेवटी मुलेच असतात. त्यांना काय चूक आणि काय बरोबर याच्यातला कळत नसतो. जसजसे ते मोठे होतात तसतसे त्यांना याची जाणीव होते. यात पालकांचाही महत्त्वाचा वाटा असतो. खरे तर पालकांचे पहिले काम हेच असते, की मुलांना काय बरोबर आणि काय चूक, त्यांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगणे. तुम्ही अनेकदा लहान मुलांना पाहिले असेल, की एखादी वस्तू खाण्याचा पदार्थ आहे असे समजून ते खातात. कधीकधी मुले काहीतरी उचलतात आणि त्यांच्या तोंडात घालतात. एखादवेळी ते विषारीही असू शकते. लहान मुलाचा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये एका मुलाने सरडा पकडला आणि तो अचानक तोंडात घालू लागला.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक माणूस त्या मुलाकडे येतो, ज्याच्या टी-शर्टवर सरडा धावत असतो. तो मुलाला सरडा दाखवतो. आता ते नेमके काय आहे, हे त्या मुलाला काय माहीत नाही. मुलाने विचार न करता सरडा पकडला आणि तो खाण्यासाठी तोंडाजवळ घेऊन जाताच त्याची आई आणि ती व्यक्ती दोघांनीही मुलाचा हात धरला. 2 सेकंदही उशीर झाला असता, तर मुलाने तो सरडा तोंडात टाकला असता. त्यानंतर काय झाले असते, हे डॉक्टरच सांगू शकतील.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर thesceneryplace नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत विक्रमी 43 दशलक्ष म्हणजेच 4.3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 1 दशलक्ष म्हणजेच 10 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, की या वयात मुलांना सांभाळणे खूप कठीण आहे, कारण प्रत्येक गोष्ट थेट त्यांच्या तोंडातच जाते, तर दुसऱ्या यूझरने लिहिले आहे, की हे मूल बेअर ग्रिल्स बनण्याचा प्रयत्न करत आहे.