मुंबई : “भारतातील कोरोना लसीकरण परिस्थिती (COVID vaccination) ही अरेंज मॅरेजसारखी (Arrange Marriage) झाली आहे. आधी तुम्ही तयार नसता, नंतर तुम्हाला मिळत नाही” अशी तुलना ‘बायोकॉन लिमिटेड’च्या सीईओ किरण मजुमदार-शॉ (Kiran Mazumdar-Shaw) यांनी केली आहे. शॉ यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर नेटिझन्सच्याही क्रिएटिव्हिटीला धुमारे फुटले आहेत. (Kiran Mazumdar Shaw compares COVID vaccination situation in India with arranged marriage)
किरण मजुमदार-शॉ यांचे ट्वीट काय?
“भारतातील कोरोना लसीकरणाची परिस्थिती ही अरेंज मॅरेजसारखी झाली आहे. आधी तुम्ही तयार नसता, मग तुम्हाला कुठलीच आवडत नाही, अखेर तुम्हाला कुठलीच मिळत नाही” असं मिश्किल भाष्य किरण मजुमदार-शॉ यांनी ट्विटरवर केलं आहे. “ज्यांना मिळाली, ते नाराज आहेत, कदाचित दुसरी आणखी चांगली असती, असा विचार ते करत आहेत. ज्यांना कुठलीच मिळाली नाही, ते कुठलीही एक मिळावी अशी इच्छा बाळगून आहेत” असंही शॉ यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत किरण मजुमदार-शॉ?
किरण मजुमदार-शॉ या बंगळुरुतील बायोटेक कंपनी ‘बायोकॉन लिमिटेड’ (Biocon Limited) आणि ‘बायोकॉन बायोलॉजिक्स’च्या (Biocon Biologics) कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. बंगळुरुतील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या त्या माजी अध्यक्ष आहेत. 68 वर्षीय किरण मजुमदार-शॉ या भारतीय अब्जाधीश उद्योजक असून त्यांनी फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही स्थान मिळवलं होतं.
The vaccine situation in India is like arranged marriage. First u r not ready, then u dont like any, then u dont get any!! Kiran Mazumdar Shaw vaccination arranged marriage
Those who got are unhappy thinking may be the other one would have been better. Those who did not get any are willing to get any one?— Kiran Mazumdar-Shaw (@kiranshaw) May 15, 2021
45 वर्षांखालील व्यक्तींच्या लसीकरणाला तूर्त ब्रेक
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने 18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र महाराष्ट्रात लसीच्या तुटवड्यामुळे तूर्तास 45 वर्षांखालील व्यक्तींच्या लसीकरणाला ब्रेक लागला आहे. तर 45 वर्ष वयोगटावरील ज्या व्यक्तींचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांना ऑनलाईन नोंदणी करुन लस घेता येणार आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाची चार नवी लक्षणे, ज्याबाबत मधुमेही रुग्णांना माहित असणे गरजेचे
रिकव्हरीनंतर कोरोनाची ही लक्षणे दिसल्यास करु नका दुर्लक्ष
(Kiran Mazumdar Shaw compares COVID vaccination situation in India with arranged marriage)