Kuno National Park: नामिबियाहून आलेल्या चित्त्यांचं घर आहे खूप सुंदर, जाणून घ्या माहिती !

| Updated on: Sep 17, 2022 | 4:47 PM

कूनो हा मध्य प्रदेशमधील एक नॅशनल पार्क आहे. 1981 साली हे पार्क निर्माण करण्यात आले होते, ते 750 चौरस किलोमीटर पसरले आहे.

Kuno National Park: नामिबियाहून आलेल्या चित्त्यांचं घर आहे खूप सुंदर, जाणून घ्या माहिती !
कुनो नॅशनल पार्क
Image Credit source: Social Media
Follow us on

भारतात आज, 17 सप्टेंबर रोजी नामिबिया येथून (Namibia) 8 चित्ते आणले आहेत. तब्बल सात दशकांनंतर भारतात चित्त्याचं (Cheetah) दर्शन होणार आहे. 70 वर्षांपूर्वी हा प्राणी भारतीय जंगलांतून (Indian Forest) लुप्त झाला होता. या सर्व चित्त्यांना स्पेशल चार्टर फ्लाइट द्वारे ग्वाल्हेरमध्ये आणले जाईल. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरमधून मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्क (Kuno National Park) मध्ये आणले जाईल. या अभयारण्यात चित्त्यांसाठी खास जागा तयार करण्यात आली आहे. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा वाढदिवस असून ते या दिवशी चित्त्यांना त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष जागेत सोडणार आहेत.

कूनो नॅशनल पार्कमध्ये हे चित्ते आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी भारतासह जगभरातील पर्यटक येतील व पर्यटनात वाढ होईल अशी आशा येथे काम करणाऱ्या लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटनात वाढ झाल्यामुळे येथील स्थानिकांसाठी नोकरीच्या संधीत वाढ होऊ शकेल. येथे दोन एकर भूखंडावर एक रिसॉर्ट तयार करण्यात येत असल्याचे, येथे काम करणाऱ्या व्यक्तींनी सांगितले. या रिसॉर्टमध्ये 14 खोल्या, एक स्वीमिंग पूल, एक रेस्टॉरंट आणि पर्यटकांसाठी इतरही अनेक सुविधा उपलब्ध करण्यात येतील. नामिबियाहून येणाऱ्या चित्त्यांचे नवे घर असणाऱ्या कूनो नॅशनल पार्कबद्दल आणखी खास माहिती जाणून घेऊया..

कूनो नॅशनल पार्क हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक नॅशनल पार्क आहे. 1981 साली त्याची स्थापना करण्यात आली असून तो 750 चौरस किलोमीटर पसरला आहे. ज्यांना वाइल्ड लाइफची आवड आहे, त्यांच्यासाठी ही जागा स्वर्गाहून कमी नाही. येथील गवताची मैदाने ही कान्हा अथवा बांधवगड टायगर रिझर्व्ह पेक्षाही मोठी आहेत. 2018 साली याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्क हे सर्व वन्यप्राणी प्रेमींसाठी खास जागा आहे. येथे प्रवेश करताच तुम्हाला तऱ्हेतऱ्हेची, वेगवेगळी झाडे दिसतील तसेच गवताची मोठी मैदाने व अनेक वन्यप्राणीही पहायला मिळतील. या वाइल्ड लाइफ सेंच्युरीच्या मध्यात कूनो नावाची नदी वाहते, ज्यामुळे येथे केवळ पाणीपुरवठाच होत नाही. तर जंगलात सिंचनासही मदत मिळते. या नॅशनल पार्कमध्ये वन्यप्राणी आणि झाडांच्या अनेक प्रजाती आढळून येतात.

 

कूनो नॅशनल पार्कमध्ये जाण्याची योग्य वेळ –

 

कूनो नॅशनल पार्कमध्ये 3 प्रवेशदारे आहेत. मात्र सर्वात लोकप्रिय आहे टिकटोली गेट. येथे, पालपूर किल्ल्याजवळ असणाऱ्या सुंदर कॅंपसाइटमध्ये राहू शकता, जेथून कूनो नदी दिसू शकते. हा या पार्कचा सर्वात सुंदर भाग आहे. पावसाळ्याच्या दिवसात येथे विहंगम दृश्य असते. कूनो नॅशनल पार्कमध्ये जायचे असेल तर ऑगस्ट ते मार्च हा काळ सर्वोत्तम मानला जातो.

 

कूनो नॅशनल पार्कमध्ये फुलं आणि प्राण्यांच्या आहेत अनेक प्रजाती –

 

या पार्कमध्ये फुलं आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. येथे झाडांच्या एकूण 123 प्रजाती, climbers & exotic species चे एकूण 32 प्रजाती, पक्षांची 206 तर माशांच्या 14 आणि उभयचर जनावरांच्या एकूण 10 प्रजाती आहेत.

कूनो नॅशनल पार्कमध्ये आढळणारे प्राणी –

ठिपकेदार हरिण किंवा चितळ , सांबर , बार्किंग हरिण, चारशिंगी , नीलगाय, चिंकारा, काळे हरिण, भारतीय ससा, माकड याव्यतिरिक्त आणखी अनेक वन्यजीव येथे आढळतील.