मुंबई : लडाख (Ladakh) निसर्गाची अमाप देन असलेला प्रदेश. तिथला निसर्ग पाहताना डोळे दिपून जातात. इथे येणाऱ्या पर्यटंकांचीही संख्या जास्त आहे. इथल्या निसर्गाचा येणारे पर्यटक पुरेपूर आनंद लुटताना दिसतात. मात्र काही खोडसाळ पर्यटक निसर्गाची हानी करताना दिसतात. त्याचे काही व्हीडिओही समोर येतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही तरुण मजा म्हणून पॅंगाँग तलावात (Pangong Tso Lake) कार चालवत आहेत. या व्हीडिओत बॅग्राऊंडला ‘बन जा मेरी तू मेहबुबा…’ हे गाणं आहे. हा व्हीडिओ पाहून नेटकरी चांगलेच संतापलेत. इतकंच नव्हे तर व्हीडीओमधील तरुणांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे. व्हायरल व्हिडीओला (Viral Video) ट्विट करत अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही तरुण मजा म्हणून पॅंगाँग तलावात कार चालवत आहेत. वरती स्वच्छ आकाश निळशार पाणी आणि अश्या निसर्गरम्य वातावरणात 3 तरूण ऑडी गाडीतून ‘तलावाची सफर’ करत आहेत. तिथे काही बियरच्या बॉटलही ठेवलेल्या दिसत आहेत. हा व्हीडिओ पाहून नेटकरी चांगलेच संतापलेत. व्हीडीओमधील तरुणांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
This reminds me of 3 idiots which also ended in Pangong lake.
Except that these literally are the 3 idiots of Pangong lake. https://t.co/KJmQGAQKOO
— Dibyendu Nandi (@ydnad0) April 12, 2022
अनेकांनी हा व्हीडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या तरूणांवर कारवाईची मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे. “मी पुन्हा एक लज्जास्पद व्हिडिओ शेअर करत आहे. असे बेजबाबदार पर्यटक लडाखची हत्या करत आहेत. तुम्हाला माहीत आहे का? लडाखमध्ये 350 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत आणि पॅंगॉन्ग सारखा तलाव अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचं घर आहे. अशा कृतीमुळे अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास धोक्यात येत आहे” असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.
I am sharing again an another shameful video . Such irresponsible tourists are killing ladakh . Do you know? Ladakh have a more than 350 birds species and lakes like pangong are the home of many bird species. Such act may have risked the habitat of many bird species. pic.twitter.com/ZuSExXovjp
— Jigmat Ladakhi ?? (@nontsay) April 9, 2022
“लडाखमध्ये काही पर्यटकांनी दाखवलेली धक्कादायक वागणूक आणि गुंडगिरी. लडाख प्रशासन, पोलिस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लडाखचे सामान्य लोक पॅंगाँग तलावाचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अश्यात हे लोक निसर्गाची अशी हानी करतात”, असं ट्विट आणखी एकाने केलं आहे.
Shocking behaviour and hooliganism shown in Ladakh by some tourists. Ladakh administration, Police and above all common people of Ladakh have been trying to preserve and protect Pangong Lake which is ecologically so sensitive. And this is what people do!pic.twitter.com/GShJBZl5sf
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 10, 2022
संबंधित बातम्या