मुंबई : लोकांना लाज वाटेल असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ट्विटरच्या (Twitter Viral Video) माध्यमातून लोकांच्या समोर आला आहे. त्याचबरोबर विविध सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून तो व्हिडीओ फिरत आहे. एक वकील एका मृतदेहाचे कागदावरती अंगठ्याचे ठसे (Thumb Impression From Dead Body) घेत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून नेटकरी त्यावर कमेंट करीत आहेत. लोकांनी या व्हिडीओची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे, त्याचबरोबर संतापलेल्या लोकांनी वाईट कमेंट केल्या आहेत.
ट्विटरवरती व्हायरल झालेल्या व्हिडीओ अनेकांनी पाहिला असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओमध्ये एक कार दिसत आहे. त्या कारच्या मागच्या बाजूला एक मृतदेह आहे. तो मृतदेह एक वयोवृध्द महिलेचा आहे. कारच्या गेटवर एक वकील उभा आहे. तो त्या मृतदेहाच्या अंगठ्यावरील ठसे घेत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून विविध पद्धतीचे प्रश्न` निर्माण झाले आहेत.
हा व्हिडीओ उत्तर प्रदेश राज्यातील असल्याचं म्हटलं जात आहे. ट्विटरवरती हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना हा व्हिडीओ टॅग केला आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून या प्रकरणाचं उत्तर मागितलं आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी कसल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही किंवा जाहीर केलेलं नाही.
नीचता की पराकाष्ठा देखिये
वीडियो आगरा के सेवला जाट का बताया जा रहा है
जिसमें एक मृतक वृद्धा से उनकी सम्पतियाँ लेने के लिए उनके शव से अंगूठा लगवाया जा रहा है
इन अमानवीय लोगों का सामाजिक बहिष्कार होना चाहिए@myogiadityanathजी@Uppolice @dgpup@agrapolice @adgzoneagra संज्ञान लीजिये pic.twitter.com/r87ZXWSAwC— Roli Tiwari Mishra सनातनी डॉ रोली तिवारी मिश्रा (@RoliTiwariMish1) April 10, 2023
हा व्हिडीओ आगराच्या सेवला जाट या परिसरातील आहे. त्यामध्ये एक वकील मृतदेहाच्या अंगठ्याचे ठसे घेत आहे. हा व्हिडीओ व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या अमानुष लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे अनेक नेटकऱ्यांनी या तथाकथित वकिलाचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.