नवी दिल्ली : जगात वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा (competition) होत राहतात. काही ठिकाणी गाणे गाण्याच्या स्पर्धा असतात, तर काही डान्स करण्याच्या स्पर्धा (dance competition) असतात. काही लोकं अशा स्पर्धा आयोजित करतात की, त्यामुळे त्याची सगळीकडं चर्चा सुरु राहते. त्याचबरोबर लोकांना आच्छर्याचा धक्का देखील बसतो. जगात अनोख्या स्पर्धेचं नियोजन सुध्दा केलं जातं. त्यामध्ये धप्पड मारणे, अधिकवेळ झोपणे, हासण्याची स्पर्धा, रडायची स्पर्धा, सध्या अशीचं एक स्पर्धा अधिक चर्चेत आहे. त्यामध्ये भाग घेणाऱ्या लोकांना आळस दाखवायचा आहे. जी व्यक्ती अधिक आळसी असेल, त्यांना पुरस्कार (laziest citizen contest) दिला जाईल. तो त्या स्पर्धेचा विजेता असेल.
युरोप देशात ही विचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्रत्येकवर्षी आयोजित केली जाते. प्रत्येकवर्षी सात आळशी लोकांना या स्पर्धेत विजेता म्हणून घोषित केलं जातं. न्यूयार्कच्या रिपोर्टनुसार, सात स्पर्धेत मागच्या २० दिवसांपासून झोपून आहेत. त्यांनी मागच्या 117 तासांचा रेकॉर्ड आता तोडला आहे. परंतु एक नवा रेकॉर्ड तयार होण्याच्या मार्गावर आहे.
या स्पर्धेला ज्यावेळी सुरुवात झाली. त्यावेळी त्यामध्ये २१ स्पर्धेक सहभागी झाले होते. हळूहळू एक-एक स्पर्धेक त्यातून बाहेर पडला. आता फक्त सात स्पर्धेक राहिले आहेत. ही स्पर्धा मागच्या १२ वर्षांपासून सुरु आहे. त्या भागात अधिक आळशी लोकं आहेत. त्यामुळे लोकांचं हसं करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत जेवण, पाणी पिणे, वाचन, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी वस्तू वापरायला परवानगी आहे. परंतु तिथं एक अट आहे की, ही सगळी काम तुम्हाला झोपून करायची आहेत. तिथं उठायचं, बसायचं आणि उभं राहायचं हे नियमांमध्ये बसत नाही. कोणताही स्पर्धेत या नियमांचे उल्लघन करेल तो बाद केला जातो. या स्पर्धेत तिथल्या स्पर्धेकाला दर आठ तासाने १० मिनिटं बाथरुमसाठी मिळतात. ही स्पर्धा जो जिंकेल, त्याला ८९ हजार रुपये देण्यात येणार आहेत.