Wild animals : सिंह, वाघ, बिबट्या आणि साप अनेकदा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करतात. जर आपण या प्राण्यांमध्ये बिबट्याबद्दल बोललो तर ते अत्यंत चलाख शिकारी म्हणून ओळखले जातात. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपले वर्चस्व टिकवण्यासाठी एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याला आपली शिकार बनवतो, पण बिबट्याची सापाशी झुंज तुम्ही क्वचितच पाहिली असेल. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) समोर आला आहे. ज्यामध्ये अजगर (Python) आणि बिबट्यामधली (Leopard) झुंज पाहायला मिळते. ती पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बिबट्या हा असा शिकारी आहे जो अतिशय हुशारीने आपल्या भक्ष्याची शिकार करतो आणि दुसरीकडे अजगराने जर एकदा आपली शिकार पकडली तर त्याला निसटणे अवघड होऊन बसते. अशा परिस्थितीत दोघांच्या या चुरशीच्या लढाईत कोण जिंकले आणि कोण हरले याचा अंदाज लावता येईल.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक बिबट्या पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर येतो आणि तिथे त्याची नजर छोट्या अजगरावर पडते. अशा स्थितीत संधी मिळताच तो हल्ला करून तोंडात दाबतो. यादरम्यान, अजगरही त्याच्यावर प्रत्युत्तर देतो पण बिबट्या स्वत:ला सावरतो आणि व्हिडिओच्या शेवटी तो त्याला दाबून निघून जातो.
wild_animals_creation नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एका यूझरने कमेंट करत लिहिले, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला समजले, की याला जंगलातील सर्वात निर्दयी शिकारी का म्हटले जाते. तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘जंगलात काय होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. विशेष म्हणजे अजगर नाहीत. विषारी, पण ते त्यांचा शिकार सहजासहजी सोडत नाहीत. जर कोणी अजगराच्या पकडीत आला तर ते मरेपर्यंत त्याचा गळा दाबतात. अजगरही बिबट्यासाठी धोकादायक ठरू शकतो, पण इथे बिबट्याचे कौतुक करायला हवे, कारण त्याने आपल्या बुद्धीने ही लढाई तर जिंकलीच, पण अजगरालाही मारले.