Video : पलटी मारली रे! बाईकवाला नशीब घेऊनच जन्माला आला म्हणायचं… कसला वाचलाय बघा

| Updated on: Jun 03, 2022 | 2:00 PM

Bike Container Accident : बाईकस्वार वेगानं डाव्या बाजूनं कारला ओव्हरटेक करता. आणि मग सुसाट उजव्या लेनमध्ये येऊन धूम स्टाईल कंटेनला टर्नवर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असतो.

Video : पलटी मारली रे! बाईकवाला नशीब घेऊनच जन्माला आला म्हणायचं... कसला वाचलाय बघा
भयंकर अपघात...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : कंटेनर (Container Accident) पलटी होण्याच्या घटना फार भीषण (Accident) असतात. कंटेनर पलटी झाला की वाहतूक खोळंबलीच समजा. एकतर पलटी झालेला कंटेनर रस्त्यावरुन हटवताना नाकी नऊ येतात. दुसरं म्हणजे कंटनेरच्या आतलं सामान दुसरीकडे सुरक्षित शिफ्ट करण्यासाठी आधी त्याहीपेक्षा जास्त कसरती कराव्या लागता. म्हणून वळणांवर कंटेनर कासवाच्या गतीने चालवले जातात. पण काही कंटेनर चालकांना वेग नडतो. वळणावर गाडी कंट्रोल होत नाही. वाऱ्याच वेग आणि गाडीचा वेग याचं संतुलन बिघडतं आणि कंटेनरचं वजन अख्ख्या रस्त्यावर आडवं होतं. असाच एक थरारक (Accident Video) व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

भयंकर

एक कंटेनर पलटी झाला. भरधाव वेगाने हा कंटेनर हायवेवरुन जात होता. या कंटेनरचा पलटी होण्याआधीच सगळा घटनाक्रम एका कारच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कारच्या फ्रन्ट कॅमेऱ्यात कैद झालेला हा अपघात काळाजाचा ठोका चुकवणारा होता.

थोडक्यात वाचला दुचाकीस्वार

नेमकं काय घडलं?

बाईकस्वार वेडेवाकडे ओव्हरटेक करत गाड्या चालवण्यात पटाईतच असतात. असा एका बाईकस्वार वेगानं डाव्या बाजूनं कारला ओव्हरटेक करता. आणि मग सुसाट उजव्या लेनमध्ये येऊन धूम स्टाईल कंटेनला टर्नवर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असतो. पण ओव्हरटेक करण्याआधी बाईकस्वार थबकतो आणि गिअर डाऊन करुन स्लो होतो.

हे सुद्धा वाचा

प्रसंगावधान

एका तीव्र वळणावर कंटेनर चालकाचा वेग आवरता येत नाही. कंटेनरचा तोल पूर्णपणे जातो. कंटेनरच्या वळण घेता घेताच कलंडतो. हे कलंडण्याआधी बाईकस्वार कंटेनरच्या खाली येतो की काय, अशी भीती कारमधून व्यक्त होताना दिसते. पण प्रसंगावधानामुळे थोडक्यात कंटेनरच्या अगोदरच बाईक आणि त्यामागे असलेली कार थांबतो. त्यामुळे मोठा अनर्थ टळतो.

काळजाचा थरकाप

या व्हिडीओमुळे कंटेनरला ओव्हर करताना जरा आजूबाजूच्यांनी सांभाळूनच जायला हवं, हे अधोरेखित केलंय. तसंच कंटेनरच्या मागून जर गाडी चालवत असाल, तर थोडं जास्तीत अंतर ठेवायला हवं. युट्युबवर अपलोड करण्यात आलेल्या अपघघाताचा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही. मात्र या अपघातातून बाईकस्वार ज्याप्रमाणे बचावला, ते काळजाचा थरकाप उडवणारं आहे.

या अपघाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.