Jungle Safari Video : जंगलातील खराखुरा निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी जंगल सफारी हा उत्तम पर्याय आहे. याद्वारे तुम्हाला वन्य प्राण्यांनाही जवळून पाहता येणार असते. पण जरा कल्पना करा, तुम्ही सफारी राइडवर आहात आणि ‘जंगलाचा राजा’ सिंह तुमच्याजवळ आला तर तुम्ही काय कराल? तसे केले तर तिथे उपस्थित सर्वांची हवा टाइट होणार हे उघड आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक सिंह (Lion) पर्यटकां(Tourist)च्या वाहनांच्या अगदी जवळ पोहोचतो. यादरम्यान पर्यटकांसोबतच सुरक्षारक्षक(Security Guard)ही टेन्शनमध्ये येतो. यानंतर काय होते, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल. हा व्हिडिओ पाहून काहीवेळ आपलाही श्वास थांबला जाईल.
जंगल सफारीदरम्यानचे दृश्य
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जंगल सफारीदरम्यान काही पर्यटकांची वाहने रस्त्यावर उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. तेवढ्यात एक सिंह त्यांच्या वाहनांच्या अगदी जवळ येतो. हे दृश्य खरोखरच धडकी भरवणारे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की ट्रॅकर सीटवर बसलेली व्यक्ती सिंहाला पाहून खूपच घाबरली आहे. सिंह आल्यानंतर कोणीही आपल्या जागेवरून हलत नाही. सिंहाला त्यांची उपस्थिती जाणवू नये, म्हणून हे केले असावे.
इन्स्टाग्रामवर शेअर
जंगल सफारीचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर richard.degouveia नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की ट्रॅकर्स सीटवर तुम्हाला कसे वाटेल? आपल्या आजूबाजूला असलेल्या वाहनांकडे लक्ष न देणे सबीसाबी रिझर्व्हच्या प्राण्यांची पिढ्यानपिढ्या जणू सवयच झाली आहे.
‘सिंह लोकांमध्ये थांबला, माझा श्वास थांबला’
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरने कमेंट करत लिहिले, की जसा सिंह लोकांमध्ये थांबला, माझा श्वास थांबला. हे खरोखर एक अद्भुत दृश्य आहे. पण त्यांना कधी राग येतो ते तुम्हाला कळणारही नाही. आणखी एका यूझरने सांगितले, की सिंहाने काही वेळापूर्वी शिकार केली असेल आणि त्याला भूक लागली नसेल. अन्यथा, ते कोणाचीही शिकार मिनिटात करू शकतात. त्याचप्रमाणे बहुतांश यूझर्सनी या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त केले आहे.
आणखी वाचा :