आपण असे अनेक खेळाडू पाहतो, ज्यांनी लहान वयातच आंतरराष्ट्रीय (International) खेळ खेळायला सुरुवात केली. अनेक खेळाडुंची उंची कमी असते, मात्र त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व मात्र मोठं असतं. म्हणूनच असं म्हणतात, की उंचीनं काहीही होत नाही, फक्त जोश आणि उत्साह, कारण हीच गोष्ट प्रत्येक खेळाडूला पुढे जाण्यास मदत करते. जोश, उत्साह असलेला असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक लहान मूल व्हॉलिबॉल (Volleyball) खेळताना दिसतंय, पण त्याचा खेळ पाहून तो त्यात निपूण खेळाडू आहे असं वाटतं. व्हिडिओ पाहून तुम्हाला याची कल्पना येईल.
मुलाचा उत्साह आणि जोश
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की काही मुले व्हॉलिबॉल खेळत आहेत, ज्यामध्ये 1 मूल बाकीच्या मुलांपेक्षा उंचीनं लहान आहे, परंतु त्याची खेळण्याची पद्धत अशी आहे, की सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. तो उडी मारतो आणि चेंडू टोलवतो. जणू त्यानं या खेळात प्रभुत्व मिळवलं आहे. हा एक अप्रतिम व्हिडिओ आहे, मुलाचा उत्साह आणि जोश पाहून प्रत्येकालाच त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे.
ट्विटर हँडलवर शेअर
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की ‘कद से भला क्या होता है, जिसमें जोश व जुनून हो, वही मैदान में उतरता है’. 11 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 44 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे.
कद से भला क्या होता है,
जिसमें जोश व जुनून हो,
वही मैदान में उतरता है.सुप्रभात. pic.twitter.com/HUGBUYIL3z
— Dipanshu Kabra (@ipskabra) January 15, 2022
‘ये बच्चा नहीं बिजली है’
अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की ‘ये बच्चा नहीं बिजली है’, तर दुसऱ्या यूझरनं ‘मन के हारे हार है मन के जीते जीत’ अशी कमेंट केली आहे. त्याचप्रमाणं आणखी एका यूझरनं मुलाचं कौतुक करताना लिहिलंय, की ‘गजब का खिलाड़ी है’.