Child funny video : मोठे झाल्यावर ज्या गोष्टी लोकांना सर्वात जास्त आठवतात त्या लहानपणीच्या गोष्टी आणि आठवणी. प्रत्येकाला आपले बालपण आवडते. प्रत्येकाला वाटते, की त्याचे बालपण परत यावे, जेणेकरून त्याला तीच मजा करता येईल, जी तो लहानपणी अनेकदा करत असे. शाळेत असो की घरात, मुले अनेकदा काही ना काही खोडकरपणा करत असतात आणि मोठी झाल्यावर तीच खोडी त्यांना खूप आठवते. तुम्ही पाहिले असेल, की शाळेतील अनेक मुले अशी असतात, की बसल्या बसल्या डुलकी (Sleep) घ्यायला लागतात. विशेषत: दुपारचे जेवण झाल्यानंतर बहुतेक मुलांमध्ये हे दिसून येते. सोशल मीडियावर अनेकदा हजारो प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असले, तरी सध्या एका लहान मुलाचा (Child) एक व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये तो डुलकी घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे, जो पाहून तुम्हाला तुमचे बालपणही आठवेल.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की वर्गात शिक्षकांचा तास सुरू आहे आणि सर्व मुलांचे लक्ष शिक्षकाकडे आहे, तर एक मूल बेंचवर बसले आहे. पण त्याचा अभ्यास सुरू आहे, असे नाही. तो डुलकी घेत असल्याचे दिसत आहे. खुर्चीवर बसून तो झोपू लागतो. त्याचे डोळेही उघडत नाहीत. जणू तो रात्री झोपला नाही आणि सकाळी शाळेत आला. डुलकी घेताना तो कधी पुढे तर कधी मागे झुकतो. हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे, जो पाहून तुम्ही खूप हसाल.
#Monday afternoon…? pic.twitter.com/XvXngU2AqH
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 21, 2022
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या 11 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 11 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, की हे केले की आमच्या शाळेत कोंबडा बनवले जात होते. तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘मी हा अनुभव समजू शकतो. शिक्षक शिकवत असताना जी झोप यायची तशी आजपर्यंत कधी गाढ झोप लागली नाही, पण आज शाळा आठवते.