इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी मोठ्यांच्या चुकांचे व्हिडीओ व्हायरल होतात, तर कधी कुठल्या अपघाताचे तर कधी लहानग्यांच्या करामतींचे…अशाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतो आहे. हा व्हिडीओ आहे एका लहानग्याच्या डायलॉगचा. पुष्पा नावाचा हा लहानगा पेट्रोल पंपावर पोहचला आहे. जिथं गाडीमध्ये इंधन भरायचं आहे, तिथंच हा सगळा संवाद घडताना दिसत आहे.
छोटा पुष्पा नावाने हे इन्स्टाग्राम अकाऊंट आहे, ज्याला 8 हजाराहून जास्त फॉलोअर आहेत. या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये हा छोटा पुष्पा कारच्या फ्रंट सीटवर बसलेला दिसतो. व्हिडीओ क्रिएटरच्या हाती गाडीचं सारथ्य आहे. पेट्रोल पंपावर महिला कर्मचारी आहे, तिला हा लहानगा म्हणतो, नीट इंधन भर, एक थेंब पण कमी नाही यायला हवा. त्यावर महिला कर्मचाऱ्यालाही हसू येतंय.
यावरच तो थांबत नाही, तर पुढे विचारतो, कितने का डालोगी? तर महिला कर्मचारी म्हणते, तुम्ही सांगाल, तितकं भरेल. या छोट्याचा हा कॉन्फिडन्स कमाल आहे. तर लहानगा म्हणतो 200 चं टाका..त्यावर व्हिडीओ क्रिएटर म्हणतो नाही 500 चं सांग.
या छोट्याला हेही माहित नाही की गाडी पेट्रोलवर चालणारी आहे की डिझेलवर. जेव्हा महिला कर्मचारी या लहान मुलाला विचारते, सर पेट्रोल की डिझेल? तर हा लहानगा म्हणतो पेट्रोल, त्यानंतर व्हिडीओ क्रिएटर त्याला करेक्ट करतो. ही गाडी डिझेलवर असल्याचं सांगतो.
डिझेल असल्याचं कळाल्यावर, हा पुन्हा आपल्या शैलीत बोलू लागतो की डिझेल डिझेल…एक्स्क्युझ मी…हा सगळा संवाद नेटकऱ्यांना चांगलाच आवडलेला दिसतो आहे.
या व्हिडीओला तब्बल 2 लाखांहून अधिक लोकांना लाईक केलं आहे. तर हजाराहून जास्त लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या लहानग्याची तारीफ केली आहे. तर काहींना हा मुलगा अति बोलत असल्याचंही वाटत आहे. मात्र असं असलं तरी हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.