Girls Basketball : ‘स्वत:वर विश्वास ठेवा, मार्ग स्वतःच सापडेल’ असे कोणीतरी म्हटले आहे. हे अगदी खरे आहे. कोणतेही काम मनापासून केले तर ते अवघड वाटेल, पण शेवटी त्यात यश मिळतेच. जर एखाद्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असेल तर त्याच्यासाठी काहीही कठीण नाही. तुम्हाला खेळाची आवड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही पाहिलं असेल की खेळाडू जिंकण्यासाठी खूप मेहनत करतात, तर काही खेळाडू (Player) असे असतात ज्यांचा स्वतःवर विश्वास नसतो आणि ते आधीच हार मानतात, पण जो खेळाडू शेवटपर्यंत जिंकण्याचा प्रयत्न करतो तोच शेवटी जिंकतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्याला पाहून तुमचा विश्वास बसेल की उंची(Height)ने काही फरक पडत नाही, पण यश (Success) त्यांनाच मिळते ज्यांचा स्वतःवर विश्वास आहे.
चेंडू बास्केटमध्ये टाकलाच
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक लहान मुलगी बास्केटबॉल खेळत आहे आणि ती इतकी कौशल्यपूर्ण खेळत आहे की उंच खेळाडू तिच्या पुढे काहीच नाहीत. 2-3 खेळाडूंना चकमा देत शेवटी तिने चेंडू बास्केटमध्ये टाकला. तिचा अप्रतिम खेळ पाहून तुम्ही नक्कीच तिचे चाहते व्हाल.
ट्विटर हँडलवर शेअर
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा अप्रतिम व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक अद्भुत गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले, ‘उंच उंचीने काय होते? जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो मैदान जिंकतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर ही गोष्टही खरी असल्याचे दिसून येत आहे.
‘स्वत:वर विश्वास हवा’
अवघ्या 8 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 17 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 2 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की जिंकणे आणि शिकणे केवळ प्रयत्नानेच शक्य आहे!’, तर दुसऱ्या यूझरने स्वत:वर विश्वास ठेवल्याने जगावर विजय मिळतो, अशी टिप्पणी केली. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने मजेशीरपणे लिहिले आहे, की तुम्ही उंच असाल तर शिडी न लावता घराचा बल्ब बदलू शकता.
ऊंची कद-काठी से क्या होता है?
खुद पर भरोसा रखने वाला ही,
मैदान में बाज़ी मारता है… pic.twitter.com/Q1YZv7vRYG— Dipanshu Kabra (@ipskabra) February 2, 2022
आणखी वाचा