मुंबई : सोशल मीडिया (Social Media) हे एक असं माध्यम आहे, ज्याद्वारे जगाच्या एका कोपऱ्यातील घटना दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचते. काही क्षणात तुमची एक पोस्ट व्हायरल (Viral Post) होऊ शकते. तुमचं सुख-दुख: क्षणार्धात जगाचं होऊन जातं. याचा प्रत्यय सध्या व्हायरल होत असलेल्या दोन पत्रातून येतोय. दोन प्रेमी युगलांना या सोशल मीडियाने जवळ आणलं. त्यांच्या मनातील भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्या आहेत. हे केवळ सोशल मीडियामुळे शक्य झालं आहे. सध्या नोटेवर लिहिलेली दोन पत्र (Love Letter) व्हायरल होत आहेत. कुसुम नावाच्या मुलीने दहा रूपयांच्या नोटेवर एक पत्र लिहिलं जे तिचा प्रियकर विशालसाठी होतं. त्यावर तिने लिहिलं होतं की माझ्या लग्नाच्या आधी मला पळवून घेऊन जा. हे पत्र इतकं व्हायरल झालं की ते तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचलं आणि त्याने उत्तर दिलंय. मी तुला घ्यायला येतोय, असं विशाल म्हणाला आहे.
एक पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे पत्र एका प्रेयसीने तिच्या प्रियकराला पाठवलं आहे. त्याचं कारणही तितकंच रंजक आहे. हे पत्र कुसुम नावाच्या मुलीने तिचा प्रियकर विशालला हे पत्र पाठवलंय. माझं 26 एप्रिलला लग्न आहे. त्याआधी तू मला पळवून घेऊन जा, असं या पत्रास म्हटलंय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कुसुमचं हे पत्र लग्नाच्या एक दिवस आधी विशालकडे पोहोचलं आहे. त्याला त्यानेही दहा रूपयांच्या नोटेवर पत्र लिहित उत्तर दिलंय. कुसुम तुझं पत्र मिळालं. मी तुला न्यायला येतोय. आय लव्ह यू! तुझाच प्रिय विशाल, असं या पत्रात लिहिलं आहे.
Ek pyar Aisa bhi.
Mil gya kusum ka jvab.
ViShal 26April aayega#LOVEDIVE pic.twitter.com/MGVV0QJX4B— AJAY YADAV (@AJAYYAD46374764) April 23, 2022
एक काळ होता जेव्हा कागदावर पत्र लिहिलं जायचं… ते पाठवलं जायचं मग त्याचं उत्तर यायचं… पण सध्या इंटरनेटचा जमाना आहे त्यामुळे दोन ओळींचा मेसेज टाईप केला समोरच्याला पाठवला विषय संपला… असंच काही घडत असतं. तरीही काही प्रेमी मात्र आजही पत्राचाचा आधार घेतात. काहीजण तर चक्क आपल्या भावना पोहोचवण्यासाठी नोटेचा आधार घेतात. अश्या नोटेवरच्या पत्राची ही गोष्ट… आता खरंच विशाल कुसुमला लग्नाच्या एक दिवस आधी पळवून घेऊन जाणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.
संबंधित बातम्या