नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानावर असो किंवा बाहेर, महेंद्रसिंग धोनी (M.S.Dhoni) हा नेहमी डोक्यावर बर्फ ठेवून वावरत असतो. त्याला चिडलेलं फारच कमी लोकांनी पाहिलं असेल. शांत डोक्याने, सर्वांगीण विचार करून निर्णय घेणारा धोनी मैदानावर भल्याभल्यांची (अक्षरश:) दांडी गुल करत असतो. आजूबाजूला कितीही आवाज असो, वा गोंधळ धोनी शांतपण, डोक्यावर जणू बर्फाची लादी ठेवलीये असा वावरतो. त्याला पाहून एखाद्या शांत ऋषींची, योगींची आठवण येते.
पण हा धोनी खरोखरंच योगींच्या अवतारात आला तर कसा दिसेल ? लगेच कल्पना करू लागलात ना ? मग त्याचा हा योगी अवतार पहायचा असेल तर हे नक्की वाचा… सध्या सगळीकडे AIचा गजर सुरू आहे. AI म्हणजे आर्टिफिशअल इंटेलिजन्स हो… ल्ली AI ने तयार केलेले अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतात. धोनीचे असेच काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर झाले असून त्यात तो योगी, योद्धा, अगदी ॲस्ट्रॉनॉटच्या (अंतराळवीर) रुपातही दिसला आहे.
wild.trance याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.