ट्विटरवर ट्रेंड झाली Maggi, कारण बनलं Zomato; लोक म्हणाले, आम्ही घरी बनवून खाऊ…

| Updated on: Mar 22, 2022 | 6:11 PM

Zomato 10-minute delivery : झोमॅटो (Zomato) या फूड डिलिव्हरी अॅपचे संस्थापक दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी क्रांतिकारी घोषणा करून सोशल मीडियावर (Social media) खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे मॅगी ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

ट्विटरवर ट्रेंड झाली Maggi, कारण बनलं Zomato; लोक म्हणाले, आम्ही घरी बनवून खाऊ...
झोमॅटोमुळे मॅगी होतेय ट्विटरवर ट्रेंड
Image Credit source: Twitter
Follow us on

Zomato 10-minute delivery : आजचे युग असे आहे, की लोकांना सर्व काही झटपट हवे असते. वाट पाहणे कोणालाही आवडत नाही. अशा परिस्थितीत झोमॅटो (Zomato) या फूड डिलिव्हरी अॅपचे संस्थापक दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी क्रांतिकारी घोषणा करून सोशल मीडियावर (Social media) खळबळ उडवून दिली आहे आणि का नाहीत येणार? घोषणाही अशी तशी नाही. कंपनीने मोठ्या स्वॅगमध्ये म्हटले आहे, की तुम्ही फक्त ऑर्डर करा, 10 मिनिटांत जेवण घरी पोहोचेल. आता ते शक्य आहे का, असा प्रश्न पडतो. उत्तर गोयलजींकडेच असेल. मात्र त्यांच्या या घोषणेनंतर अचानक मॅगी ट्विटरवर ट्रेंड करू लागली आहे. आता तुम्ही विचार करत असाल की मॅगीचा झोमॅटोच्या घोषणेशी काय संबंध आहे. चला तर मग जाणून घेऊया आता मॅगी काय बोलत आहे. खरे तर 10 मिनिटांत जेवण पोहोचवणे या घोषणेनंतर गोयल यांनी आणखी एक ट्विट केले आहे.

’10 मिनिटांच्या फूड स्टेशनद्वारे मॅगी सर्व्ह करू’

ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे, की आम्ही तुम्हाला आमच्या 10 मिनिटांच्या फूड स्टेशनद्वारे मॅगी सर्व्ह करू. यासोबतच त्यांनी एक स्मायलीही टाकली आहे. या ट्विटनंतर मॅगी ट्विटरवर ट्रेंड करत आहे. लोकांनी मॅगीच्या पोस्टने ट्विटर भरले आहे. वास्तविक, लोक गोयल यांच्या पोस्टची मजा घेत आहेत आणि झोमॅटोकडून मॅगी कोणाला मिळते, हे मजेदार मीम्सद्वारे विचारत आहेत. आमची लाडकी मॅगी अशी आहे, की ती दोन मिनिटांत कोणीही झटपट बनवू शकते. चला तर मग बघू या निवडक ट्वीट्स…

नवी सेवा पुढील महिन्यापासून

गोयल म्हणाले, “मला असे वाटते की झोमॅटोकडून 30 मिनिटांचा सरासरी वितरण वेळ खूपच मंद आहे आणि लवकरच स्पर्धेतून बाद होईल.” जर आपण हे केले नाही तर दुसरे कोणीतरी करेल. टेक इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी नवनवीन गोष्टी करत राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. म्हणूनच आम्ही 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी ऑफरला Zomato Instant असे नाव दिले आहे. पुढील महिन्यापासून नवीन सेवा सुरू होणार आहे.

आणखी वाचा :

काय, आठवले ना लहानपणीचे दिवस? कसा बिनधास्तपणे डुलक्या घेतोय? Viral video पाहून खूप हसाल

#JanataCurfew : दोन वर्षांपूर्वी याच दिवशी…; एका क्लिकवर पाहा, पोट दुखेपर्यंत हसवणारे Memes अन् Videos

‘हे’ तर रिअल लाइफमधले tom & jerry! मांजरीला पाहून उंदीर काठीच्या टोकावर..! Funny video viral