सातारा : महाराष्ट्राचे नंदनवन अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी वास्तव्यास आहेत. पत्नी टिना अंबानी यांच्यासह अनिल लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवसांपासून राहत आहेत. अंबानी दाम्पत्य इव्हनिंग वॉक करत असलेलं गोल्फ मैदान गर्दीच्या कारणास्तव महाबळेश्वर नगरपालिकेने बंद केले आहे. (Mahabaleshwar Corporation shuts Golf Park where Anil Ambani had evening walk)
मेहतांच्या बंगल्यात वास्तव्य
डायमंड किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनुम मेहता यांच्या लाल बंगल्यावर अंबानी दाम्पत्य राहत आहे. फिटनेस फ्रीक असल्यामुळे अंबानी सकाळ-संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरायला जातात. मग ती मुंबई असो वा महाबळेश्वर. आता महाबळेश्वरची हवा तर अधिकच आल्हाददायक. त्यामुळे इव्हनिंग वॉकचा शिरस्ता अनिल अंबानींनी चुकवला असता, तरच नवल.
गावकरीही गोल्फ मैदानावर
उद्योगपती अनिल अंबानी पत्नी टिना अंबानी यांच्यासह दररोज इव्हनिंग वॉक करण्यासाठी महाबळेश्वरमधील गोल्फ मैदानावर येत असत. गावातील मंडळीही संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत. अंबानी जोडपे महाबळेश्वरला असल्याची कुणकुण लागताच गावकऱ्यांची पावलंही गोल्फ मैदानाकडे वळली. या मैदानावर इव्हिनिंग वॉकसाठी येणाऱ्या इतर नागरिकांची गर्दी वाढली होती.
नगरपालिकेकडून मैदानाला टाळं
याची माहिती महाबळेश्वर नगरपालिकेला मिळाली. गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या द क्लबला महाबळेश्वर नगरपालिकेने नोटीस बजावली. पालिकेने नोटीस बजावल्यामुळे द क्लबने गोल्फ मैदान फिरण्यासाठी बंद करण्यात आले आहे. पालिकेनेच टाळे ठोकल्यामुळे आता या मैदानावर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे आपसूकच अनिल अंबानी आणि पत्नी टिना अंबानी या दाम्पत्याचा इव्हनिंग वॉकही बंद झाला.
संबंधित बातम्या :
अनिल अंबानींनी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकले हेड ऑफिस, कितीला सौदा झाला?
रिलायन्स होम फायनान्स डिफॉल्टरच्या यादीत, व्याजही नाही चुकवू शकली अनिल अंबानींची कंपनी
(Mahabaleshwar Corporation shuts Golf Park where Anil Ambani had evening walk)