मुंबई : विमानाच्या एमर्जन्सी लॅंडिंगच्यावेळी (Plane Emergency Landing) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमानाला भीषण आग लागली. शिवाय या विमानाचे तुकडे-तुकडे झाले आहेत. ही घटना अमेरिकेतील कोस्टा रिका (America Costa Rica) इथे घडली आहे. डेली स्टार या वृत्तसंस्थेने याविषयीची माहिती प्रसारित केली आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, कोस्टा रिकामधील जुआन सांतामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Juan Santamaria International Airport) हा भीषण अपघात झाला आहे. डीएचएल Boeing 757-200 (DHL Plane Accident) या मालवाहू विमानाला काही कारणांमुळे एमर्जंन्सी लॅंडिंग करावं लागलं. यावेळी हा भीषण अपघात झाला. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कोस्टा रिकामधील जुआन सांतामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा भीषण अपघात झाला आहे. डीएचएल Boeing 757-200 या मालवाहू विमानाला काही कारणांमुळे एमर्जंन्सी लॅंडिंग करावं लागलं. यावेळी हा भीषण अपघात झाला. विमान लॅंड होत असतानाच विमान उलट फिरतं. त्याला आग लागली. शिवाय त्याचा मागचा भाग तुटला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत, असं डीएचएल कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. तर एकाला वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. डेली स्टार या वृत्तसंस्थेने याविषयीची माहिती प्रसारित केली आहे.
हे अपघातग्रस्त विमान गौंटमाला जात होतं. त्याच्या हायड्रॉलिक्स सिस्टममध्ये बिघाड झाला. त्यानंतर पायलटने विमानाला इमर्जन्सी लँडिंगसाठी जुआन सांतामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळाला विनंती केली. त्यांनी या लॅंडिंगला परवानगी दिली. विमान लॅन्ड होऊ लागलं. पण इतक्यात अपघात झाला. डीएचएल कंपनीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या