नवी दिल्ली : माणसांच्या आयुष्यात अनेक नाती असतात, त्यातील एक खास नातं म्हणजे पती-पत्नीचं. हे नातं एकदा जोडलं की, ते आयुष्यभर जपलं जातं. आम्ही जी एका लग्नाची दुसरी गोष्ट सांगणार आहे ती ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटणार आहे. परदेशात घटस्फोटाची प्रकरणे अनेकदा पाहायला मिळतात. मात्र आपल्या देशात हे क्वचितच पाहायला मिळते, ज्याप्रमाणे प्रेयसी आणि प्रियकराचे नाते काही महिन्यात तुटत असते, त्याचप्रमाणे परदेशात लग्नंही तुटतात. मात्र काही नाती कित्येक वर्षांनंतर तुटतात तेव्हा खूप वाईट वाटते, परंतु या संबंधित एक विचित्रच प्रकरण आजकाल चर्चेत आले आहे.
या प्रकरणात एका पती-पत्नीचे लग्न मोडले आहे, मात्र तिच्या नवऱ्याला दुःख न होता, तो आनंदाने उड्या मारू लागला. त्याच्या या प्रकारामुळे अनेक जणांनी मात्र आश्चर्य व्यक्त केले आहे.
पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर मात्र एंगसने आपल्या कारवर ‘जस्ट डिवोर्स्ड’ असा लिहून त्याने अक्षरशः शहरात फिरत सुटला होता. विशेष म्हणजे त्यांचे 23 वर्षांचे नाते तुटले असले तरीही तो दु:ख करण्याऐवजी आनंदाने फिरताना लोकांना दिसला आहे.
एंगसच्या 47 वर्षीय पत्नीचे नाव सोफी केनेडी आहे. त्यांना मुलंही आहेत, तर त्यांचे वय 11 आणि 23 वर्षे आहे. आता हे जोडपे वेगळे झाले असले तरी आनंदी आहे.
घटस्फोटानंतरही त्यांची पूर्वीची असलेली पत्नी सोफीसोबतचे त्याचे नाते ते शाबूत ठेवणार आहेत. आणि हे नाते त्यांचे मैत्रीचेच असणार आहे. गाडीवर ‘जस्ट डिवोर्स्ड’ असा टॅग लावून शहरात फिरण्यामागचे कारण सांगताना तो म्हणाला की घटस्फोटानंतरही माणूस सुखी राहू शकतो हे जगाला दाखवायचे आहे. ही जीवनाची नवीन सुरुवात देखील असू शकते असं त्याचे मत आहे.