Video viral : बेभान होऊन डान्स करतो अन् फांदीसह जमिनीवर कोसळतो, पुढे काय होतं? पाहा…

| Updated on: May 25, 2022 | 11:21 AM

एक व्यक्ती या जोडप्यांसोबत नाचता नाचता रस्त्याकडील एका झाडावर आनंदाच्या भरात चढते आणि त्याला हेलकावे खात डान्स करते. मात्र ते झाड कमकुवत झाल्याने ओझ्यामुळे त्याची फांदी तुटते आणि ती व्यक्ती फांदीसह जमिनीवर कोसळते.

Video viral : बेभान होऊन डान्स करतो अन् फांदीसह जमिनीवर कोसळतो, पुढे काय होतं? पाहा...
डान्स करताना झाडाच्या फांदीसह कोसळते व्यक्ती
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : अति उत्साह कसा भोवतो, हे दाखवणार व्हिडिओ सध्या व्हायरल (Video viral) झाला आहे. लग्नाच्या वरातीतील हा व्हिडिओ असून एका लग्नाच्या वरातीत नाचत असताना एक व्यक्ती अती उत्साहित होऊन बाजूला असलेल्या झाडावर चढतो आणि झाडाला पकडून नाचू लागतो. मात्र ते झाड कमकुवत असल्याने थेट त्याच्या अंगावर पडले (Collapsed) आणि ती व्यक्ती जमिनीवर कोसळते. यात ती व्यक्ती जिवंत आहे की मृत हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र तो जमिनीवर कोसळल्यानंतर निपचीप पडलेला दिसून येत असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. लग्नाच्या वरातीतील हा बेभान होऊन नाचत असतानाचा व्हिडिओ आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे, हे मात्र समजू शकले नाही. मात्र व्हिडिओतील व्यक्ती पाहता तो महाराष्ट्रातील नसून बाहेरील राज्यातील असावा, असे दिसते.

डान्स करताना नाही राहत भान

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. लग्नसराई असल्याने अनेकजण हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न करत असतात. लग्नातील वरातीमध्ये वऱ्हाडातील मंडळी बेभान होऊन नाचतानाचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतीलच. नाचत असताना त्यांना कुठलेही भान राहत नाही. काही जण नागीण डान्स करतात, तर कोणी घोड्यावर बसून बेभान होऊन आनंद साजरा करतात.

हे सुद्धा वाचा

फांदीसह कोसळतो जमिनीवर

सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत नातेवाईकांची गर्दी तर जास्त दिसत नाही. मात्र एक जोडपे दिसत आहे. ते नाचत आहे. तर त्यांच्या आजूबाजूला काही व्यक्ती दिसत आहे. डीजे लावला असून त्याच्या तालावर ही मंडळी नाचत आहेत. त्यातीलच एक व्यक्ती या जोडप्यांसोबत नाचता नाचता रस्त्याकडील एका झाडावर आनंदाच्या भरात चढते आणि त्याला हेलकावे खात डान्स करते. मात्र ते झाड कमकुवत झाल्याने ओझ्यामुळे त्याची फांदी तुटते आणि ती व्यक्ती फांदीसह जमिनीवर कोसळते. त्यानंतर आजूबाजूचे लोक पाहायला येतात, मात्र ती व्यक्ती काहीच हालचाल करीत नाही.