Black Hairy Tongue syndrome : मानवी शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागावर केस वाढतात, परंतु तुम्ही कधी ऐकले आहे की एखाद्याच्या जिभेवर केस वाढले आहेत? तेही दाट आणि काळेभोर! असाच एक धक्कादायक (Shocking) प्रकार अमेरिकेतून (America) समोर आला आहे. जगभरातील तज्ज्ञ आणि डॉक्टरांना (Doctors) याबद्दल जाणून आश्चर्य वाटले आहे. अमेरिकेत एका व्यक्तीची जीभ अचानक काळी पडू लागली आणि त्यावर दाट केस वाढत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या व्यक्तीच्या जिभेवर केस वाढताना पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. या 50 वर्षीय व्यक्तीने डॉक्टरांना झालेल्या या अनोख्या आजाराबाबत सांगितले, की त्याच्या जिभेवर केस वाढल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, परंतु त्यामुळे त्याला अनेक समस्या निर्माण होत आहेत.
डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या जिभेची तपासणी केली असता त्यांना जिभेतील काळ्या केसांच्या खाली एक पिवळा थर असल्याचे आढळून आले. त्याच्या वरच्या भागात काळे केस वाढले आहेत. जामा डर्माटोलॉजी जर्नलमध्ये (JAMA Dermatology Journal) या अनोख्या आजारावर एक लेख लिहिला गेला होता. हे लिहिताना डॉक्टरांनी सांगितले, की जिभेवर जाड काळा थर पडला होता. तसेच जिभेच्या मध्यभागी आणि मागील बाजूस एक पिवळा थर होता. याला ‘ब्लॅक हेअरी टंग सिंड्रोम’ असे म्हणतात.
Man Discovers He Has Especially Severe Case Of “Black Hairy Tongue”https://t.co/lE8kO0aYMF pic.twitter.com/gGCkQFVv5w
— IFLScience (@IFLScience) March 10, 2022
त्या व्यक्तीने सांगितले, की त्याला तीन महिन्यांपूर्वी एक आजार झाला होता, त्यामुळे त्याच्या शरीराच्या डाव्या बाजूला अशक्तपणा आला होता. यानंतर त्याने शुद्ध अन्न आणि द्रवपदार्थ घेण्यास सुरुवात केली. आता त्याच्या जिभेला एक विचित्र आजार जडला आहे. एका अहवालानुसार, जिभेवर मृत त्वचेच्या पेशी जमा झाल्यामुळे असे होऊ शकते. याशिवाय, प्रतिजैविकांचे दुष्परिणाम, धूम्रपान किंवा मऊ आहार घेतल्याने देखील हे होऊ शकते. याशिवाय तोंडाची योग्य स्वच्छता न करणे, कोरडे तोंड हे देखील याचे कारण असू शकते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, योग्य अन्न खाऊन आणि तोंड स्वच्छ ठेवून या आजारावर उपचार करता येतात. या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीने तोंडाची काळजी घेण्याचा आणि योग्य स्वच्छता करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.