मुंबई : लोकं ज्या व्यक्तीवर प्रेम करतात, त्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतात हे अनेकदा आपण व्हिडीओच्या (VIRAL VIDEO) माध्यमातून पाहिलं आहे. एका कपलने फिरणे, एकमेकांना सरप्राईज (surprise) देणं ही एक साधी गोष्ट आहे. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांना (girlfriend boyfriend video) सरप्राईज देतात, त्याचे रोज असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यामध्ये काहीजण असे असतात, की त्यांचं प्रकरण लग्नापर्यंत जातं. अधिकतर लोकांचं नातं हे लग्नाच्या आगोदरचं तुटल्याचं पाहायला मिळतं. परंतु जी लोकं खरचं प्रेम करतात. ती लोकं आपल प्रेम सिद्ध करण्यासाठी कुठल्याही थराला जातात. सध्या सोशल मीडियावर एक असेचं प्रकरण व्हायरल झालं आहे.
खरंतर, त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करीत आहे. विशेष म्हणजे ती व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडला विमानतळावर सरप्राईज देत आहे. त्याच्या प्रेयसीला ही गोष्ट अधिक धक्कादायक आहे. त्याच्या प्रेयसीला अशा पद्धतीने प्रपोज करेल असं वाटलं नव्हतं, त्यामुळे तिला धक्का बसला आहे. प्रियकराला विमानतळावर असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे. हा व्हिडीओ ऑकलैंड एयरपोर्टवरचा आहे. हा प्रकार विमानतळावर पाहणाऱ्या लोकांना धक्का बसला आहे.
हा चांगला व्हिडीओ सोशल मीडियावर ऑकलैंड एयरपोर्टच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 29 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर शेकडो लोकांनी त्या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून खूपचं छान असं म्हटलं आहे. एअरपोर्टकडून दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या क्षणी आम्ही तुमच्यासोबत होतो असंही त्यांनी म्हटलं आहे.