Desi Jugaad : जर तुम्ही व्यायामशाळेत (Gym) जात असाल किंवा व्यायाम (Exercise) करत असाल, तर ट्रेडमिल (Treadmill) म्हणजे काय हे तुम्हाला चांगले माहीत असेल. ट्रेडमिल एक असे उपकरण आहे जे धावण्याचा व्यायाम खूप सोपे करते. आजकाल, तुम्हाला जवळपास प्रत्येक जिममध्ये ट्रेडमिल सापडतील. बरेच लोक ते अगदी घरांमध्ये देखील वापरतात, कारण ते कमी जागा व्यापते आणि वापरण्यास देखील सोपे आहे. त्याची खासियत म्हणजे त्यावर तुम्ही वेगवेगळ्या वेगानुसार धावू शकता म्हणजेच तुमच्या सोयीनुसार वेग ठरवू शकता. यासाठी विजेची गरज असली, तरी एका भारतीयाने देशी जुगाडातून विजेशिवाय चालणारी ट्रेडमिल बनवली आहे, जी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक माणूस लाकडाच्या मदतीने ट्रेडमिल बनवताना दिसत आहे.
तुम्ही तुमच्या आयुष्यात लाकडापासून बनलेली ट्रेडमिल कधीच पाहिली नसेल. हा अनोखा आविष्कार पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हा माणूस ट्रेडमिल बनवण्यासाठी लाकूड आणि नट बोल्टचा वापर करत आहे. तो नट बोल्ट लाकडात अशा प्रकारे बसवतो, की तो गोलाकार गतीने फिरवता येईल. यानंतर, तो लाकडाचे छोटे तुकडे वापरून एक उत्तम ट्रेडमिल बनवतो, जी विजेशिवाय चालते. त्याचे दोन फायदे आहेत. एक, तुमची विजेची बचत होईल आणि दुसरे म्हणजे तुमचा व्यायामही होईल. त्या व्यक्तीची ही अप्रतिम सर्जनशीलता आणि जुगाड पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात.
Amazing treadmill that works without power. pic.twitter.com/iTOVuzj6va
— Arunn Bhagavathula చి లిపి (@ArunBee) March 17, 2022
@ArunBee नावाने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शन लिहिले आहे, ‘विजेशिवाय काम करणारी ग्रेट ट्रेडमिल’. 45 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 46 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की हा खऱ्या प्रतिभेचा पुरावा आहे, तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की हा खरा इंजिनिअर आहे.