VIDEO | विभक्त झालेल्या पत्नीने नवऱ्याला कारच्या बोनेटवरुन फरकटत नेले, व्हिडीओ पाहिल्यानंतर…

| Updated on: May 23, 2023 | 11:03 AM

Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ परदेशातील असून पावसात घटस्फोट घेतलेल्या पत्नीच्या कारसमोर नवऱ्याने उडी मारली. ती कार वेगाने निघाली आहे, त्यानंतर काय झालंय हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.

VIDEO | विभक्त झालेल्या पत्नीने नवऱ्याला कारच्या बोनेटवरुन फरकटत नेले, व्हिडीओ पाहिल्यानंतर...
Viral Video
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : रस्त्यावर लोकांच्या चुकीमुळे किती अपघात (car news) होतात, हे आपण नेहमी पाहतो. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. महाराष्ट्रात (maharashtra) सुध्दा कारच्या बोनेटवरुन अनेकांना फरकटत नेल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पावसात एक व्यक्ती कारच्या बोनेटवरती बसल्याची दिसत आहे. त्याचबरोबर कार चालक एकदम स्पीडमध्ये आपली कार (Viral Video) चालवत आहे अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

सोशल मीडियावर आतापर्यंत ट्रॅफिक पोलिसांना अनेकांनी फरकटत नेल्याच्या अनेक घटना व्हिडीओच्या माध्यमातून उजेडात आल्या आहेत. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ चीनचा असल्याचा सांगितला जात आहे. एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार एका चायनीज व्यक्ती त्याच्यापासून विभक्त झालेल्या पत्नीच्या कारवर उडी घेतो. त्यानंतर त्याच्यापासून विभक्त झालेली पत्नी 70 च्या स्पीडने कार चालवत आहे.

हे सुद्धा वाचा

कारच्या बोनेटवरती ती व्यक्ती दिसत आहे

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ सगळ्याचं लक्ष खेचतं आहे. हा व्हिडीओ ट्विटरवरती @NoContextHumans या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मुसळधार पावसात बोनेटवरती बसल्याचं दिसतं आहे. गाडी चालवत असलेली महिला गाडी फुल्ल स्पीडमध्ये गाडी चालवत आहे. व्हिडीओमध्ये महिला हायवेवरती आपली कार 70 च्या स्पीडने चालवत आहे.

व्हिडीओ पाहून युजर्सला बसला धक्का

विभक्त झालेल्या नवऱ्याची मजबूरी असल्यामुळे त्याने कारच्या बोनेटला मजबूत पकडलं आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने मजबूत पकडल्यामुळे त्याचा कुठेही अपघात झाला नाही. हा व्हिडीओ 43 सेकंदाचा आहे, ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, त्यांना मोठा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर 17 हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. काही लोकांनी या व्हिडीओ कमेंट केल्या आहेत. त्यामध्ये ते म्हणतं आहेत की, खतरनाक प्रवास आहे.