Online Interview video : कोरोना (Covid 19) आल्यापासून लोकांचे जीवन ऑफलाइनवरून ऑनलाइनकडे वळले आहे. घरातून मुलांची शाळा, तरुणांचे घरातून ऑफिस… ऑनलाइन क्लासेसपासून ऑनलाइन नोकरीच्या मुलाखती हे आजच्या काळात सामान्य झाले आहे. हे ऑनलाइन मॉडेल शहरांसाठी खूप चांगले आहे परंतू जे लोक खेड्यात राहतात, त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत लोक त्याचे पर्याय शोधू लागतात. अलीकडेच एका व्यक्तीने सोशल मीडियावर आपली एक गोष्ट शेअर केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे. हे प्रकरण मलेशियातील सारवाकचे आहे, जिथे मलेशियामध्ये (Malasia) राहणाऱ्या 19 वर्षीय फ्रँक स्टुअर्ड पँटिंगला नोकरी (Job) मिळाली आणि त्याला ऑनलाइन (Online) मुलाखत द्यायची होती, परंतु नेटवर्कमुळे त्याची नोकरी जात राहिली. या व्यक्तीने फेसबुकवरही आपली कहाणी शेअर केली, जी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
खरे तर फ्रँक स्टीवर्ड पँटिंगला लहानपणापासूनच शिक्षक व्हायचे होते, या स्वप्नातील नोकरीसाठी त्याने खूप मेहनत घेत अभ्यास केला, त्याने नोकरीसाठी अर्ज केला होता पण जेव्हा त्याला मुलाखतीसाठी फोन आला तेव्हा त्याची चिंता वाढली कारण गावात फ्रँकचे इंटरनेट कनेक्शन खूपच खराब होते. अशा परिस्थितीत आपली नोकरी वाचवण्यासाठी फ्रँकने दोन तास डोंगर चढून स्थिर नेटवर्कचा शोध घेतला. सुमारे दोन तास डोंगर चढून गेल्यावर त्याला इंटरनेट कनेक्शन चांगले असलेली जागा सापडली.
फ्रँकने तेथे चटई टाकली. मागे पडदा लटकवून तिथे बसून मुलाखत दिली. इतकेच नाही तर मुलाखतीदरम्यान त्याला किडे चावत होते. पण त्याने तसे अजिबात जाणवू दिले नाही आणि मुलाखत पूर्ण केली. फ्रँकच्या या प्रयत्नाचे लोकांनी खूप कौतुक केले. एका यूझरने लिहिले, ‘मी तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘तुमचा प्रयत्न खरोखर प्रशंसनीय आहे.’ दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘मुलाने या कामासाठी किती मेहनत घेतली आहे. आशा आहे की त्याला हे काम नक्की मिळाले असेल. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या मुलाचे कौतुक केले.