Video | केळीची पाने कापून बनवला हलवा, नेटकऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटले

| Updated on: May 20, 2023 | 11:26 AM

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याने जो काही पदार्थ तयार केला आहे, त्यामुळे अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. केळीच्या पानापासून त्याने हलवा तयार केला आहे.

Video | केळीची पाने कापून बनवला हलवा, नेटकऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटले
Banana Leaf Halwa Viral Video
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : काही लोकं इतकी आंतरंगी असतात की, प्रत्येकवेळी ते नवा शोध लावत असतात. सध्या एका असाचं व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मुलाने केळीची पानं कापून (Banana Leaf Halwa Viral Video) त्यापासून हलवा तयार केला आहे. व्हिडीओमध्ये ज्या मुलाने हलवा (Halwa) तयार केला आहे. तो एकदम साध्या पद्धतीने हलवा करीत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. केळीच्या बागेत हा प्रयोग एका व्यक्तीने केल्याचं व्हिडीओ स्पष्ट दिसत आहे. केळीच्या पानापासून हलवा तयार केल्याचं लोकांना माहित झाल्यापासून लोकं हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहत आहेत. त्याचबरोबर अनेक लोकांनी हा व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यानंतर कमेंट सुध्दा केली आहे.

अनेकांना गाजराचा हलवा अधिक आवडतो, त्यामुळे काही लोकं जिथं शक्य आहे तिथं गाजराचा हलवा खात असतात. आपल्या देशात लाखो लोकं गाजर हलव्याचे दिवाने आहेत. दुसरीकडे, काही लोकांना लौकीपासून रव्यापर्यंत हलवा बनवायला आवडते. सध्या जो एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे केळीच्या पत्त्यांपासून तयार केलेला हलवा पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर अनेकांच्या कमेंट वाचणीय आहेत.

हे सुद्धा वाचा

केळ्याच्या पानापासून हलवा तयार केला

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगा केळीची पाने कापत आहे. त्यानंतर केळीच्या पानाचे एकदम छोटे-छोटे तुकडे करीत आहे. त्यानंतर त्या तुकड्यांना मिक्सरमध्ये बारीक केले जाते. त्यानंतर एका भांड्यात त्यांच विविध मिश्रण टाकून शिजवायला सुरुवात केली आहे. ज्यावेळी त्यामध्ये पाणी उकळतं, त्यानंतर अनेक साहित्य त्यामध्ये टाकलं जातं. ज्यावेळी हलवा पुर्णपणे तयार झाला आहे, त्यावेळी तयार करीत असलेल्या व्यक्तीची अॅक्शन पाहण्यासारखी आहे.

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट

ज्यावेळी हलवा तयार होतो, त्यावेळी त्यावरती एक ड्रायफूड टाकलं जात आहे. तिथं त्या व्यक्तीला मदत करणारा मित्र ज्यावेळी तयार झालेल्या हलव्याची टेस्ट करतो. त्यावेळी त्याला शुभेच्छा सुध्दा देत आहे. हा व्हिडीओ brokenboyscooking नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामवरती शेअर केला आहे. या व्हिडीओ 50 हजार पेक्षा अधिक लोकांना लाईक सुध्दा केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, हे सगळं पाहून मला आश्चर्य वाटलं आहे.