Viral Video : ‘असे’ पॉपकॉर्न कधी पाहिले नसतील; यूझर्स म्हणतायत, 2022मध्ये एवढंच पाहायचं राहिलं होतं!

| Updated on: Jan 31, 2022 | 11:05 AM

सोशल मीडिया(Social Media)त काय काय होईल, याचा अंदाज लावणं कठीण आहे. इथले लोक प्रसिद्ध होण्यासाठी काय करतील याच नेम नाही. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा ज्यात एका व्यक्तीनं पॉपकॉर्न (PopCorn) तयार करण्यासाठी स्कूटीच्या सायलेन्सर(Scooty silencer)चा 'सहारा' घेतला आहे.

Viral Video : असे पॉपकॉर्न कधी पाहिले नसतील; यूझर्स म्हणतायत, 2022मध्ये एवढंच पाहायचं राहिलं होतं!
स्कूटीच्या सायलेन्सरमध्ये पॉपकॉर्न बनवताना
Follow us on

Popcorn made in scooty silencer : सोशल मीडिया(Social Media)त काय काय होईल, याचा अंदाज लावणं कठीण आहे. इथले लोक प्रसिद्ध होण्यासाठी काय करतील याच नेम नाही. अनेकवेळा हे लोक जिथं आपल्या कामातून प्रसिद्ध होतात, तिथं कधी-कधी त्यांची कृत्यं पाहून संतापही येतो. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा ज्यात एका व्यक्तीनं पॉपकॉर्न (PopCorn) तयार करण्यासाठी स्कूटीच्या सायलेन्सर(Scooty silencer)चा ‘सहारा’ घेतला आहे. तुम्ही जेवणाबाबत अनेक प्रकारचे प्रयोग पाहिले असतील, पण पॉपकॉर्न बनवण्यासाठी स्कूटीचा आधार घेताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तो पाहिल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणत आहेत की हे कोण आहेत, हे लोक कुठून आले आहेत!

स्कूटीत भाजतोय मक्याचे दाणे

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीनं स्कूटी सुरू केली आहे आणि हळू हळू त्याच्या सायलेन्सरमध्ये मक्याचे दाणे तो टाकत आहे. त्यामुळे ते भाजले जात असून पॉपकॉर्न बनत आहेत. यासोबतच रेस वाढवून त्या माध्यमातून ते बाहेर काढून पॉपकॉर्न पुन्हा ग्लासात भरत आहे. हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

मजेदार कमेंट्स

ही विचित्र व्हिडिओ क्लिप thegreatindianfoodie या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओला पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच त्यानं त्यावर एक मजेशीर कॅप्शनही लिहिलं आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरनं लिहिलंय, ‘क्या बकवास है. पॉपकॉर्न को तो छोड़ दो भाई.’ आणखी एकानं लिहिलंय, की ‘बस 2022 में ये ही देखना बाकी रह गया था.’

Creative Work : ‘हा’ मुलगा असं काही करतो, की शॉवरसारखं पाणी यायला लागतं; जुगाडचा Video Viral

Funny Dance : याला आवरा, नाहीतर तुम्हालाही चावल्याशिवाय राहणार नाही..! नागीण डान्सचा ‘हा’ Viral Video पाहताना हसून हसून पोट दुखेल

Viral Video : ग्रामस्थांनी अस्वलाला केलं मोबाइल कॅमेऱ्यात कैद, जाळीचा देव मंदिर परिसरात मुक्त संचार