Car driving stunt : जगात अशी अनेक माणसं आहेत ज्यांना काहीतरी साहसिक करण्याची हौस आहे. कुणी उंच डोंगरावरून खाली उडी मारून धोकादायक स्टंट (Stunt) करतो, तर कुणी विमानातूनच उडी मारतो. बरेच लोक समुद्रात उडी मारून आश्चर्यकारक असं काहीतरी दाखवतात. काही लोकांना धोकादायक ठिकाणी वाहन चालवण्याची हौस असते. असे स्टंट धडकी भरवणारे असतात. अशा धोकादायक स्टंटशी संबंधित व्हिडिओ (Video) अनेकदा सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.
चुकीला स्थान नाही
व्हिडिओमध्ये एक माणूस टेकडीवर धोकादायक पद्धतीनं कार वळवण्याचा पराक्रम करताना दिसत आहे. ज्या ठिकाणी तो वळवत होता आणि गाडी ज्या मार्गानं वळत होती, तिथं कोणत्याही चुकीला स्थान नाही. कारण किरकोळ चूकदेखील जीवावर बेतणारी आहे. कारसह खोल दरीत ती व्यक्ती कोसळू शकते, ज्यामुळेजीवितहानीदेखील होण्याची शक्यता आहे.
गाडी चालवण्याच्या कौशल्याचं अप्रतिम उदाहरण
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की ड्रायव्हर कसा हळूहळू गाडी वळवत आहे. कधी तो गाडी थोडी पुढे सरकवतोय तर कधी मागे. त्याचा अंदाज किती अचूक आहे, कारण गाडी एक इंचही मागे गेली तर ती खड्ड्यात पडणार आहे, हे त्याला माहीत आहे. पण ड्रायव्हरनं अशा ठिकाणी गाडी वळवण्याची जोखीम पत्करून गाडी चालवण्याच्या कौशल्याचं अप्रतिम उदाहरण समोर ठेवलंय. त्याचा आत्मविश्वास यातून दिसून येतोय.
ट्विटरवर शेअर
हा चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @DoctorAjayita या नावानं शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 26 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केलं आहे.
The perfect 80 point turn! pic.twitter.com/bLzb1J1puU
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) January 23, 2022
‘सुपर ह्युमन’
अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध कमेंट्स केल्या आहेत आणि ड्रायव्हर आणि ड्रायव्हिंग कौशल्याचं कौतुक केलं आहे. एका यूझरनं लिहिलंय, की कारच्या आत बसलेला माणूस सुपर ह्युमन आहे, तर दुसऱ्या यूझरनं ‘बडे भारी ड्रायव्हर हो भाई’ अशी कमेंट केली आहे.